मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन, अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना मोठा धक्का

21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन, अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना मोठा धक्का

मेघा ठाकूर

मेघा ठाकूर

शरीर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या इंडो-कॅनेडियन टिकटॉकरचं निधन झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 4 डिसेंबर : शरीर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या इंडो-कॅनेडियन टिकटॉकरचं निधन झालं आहे. मेघाचं वय 21 वर्षे होते. तिच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आई-वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. या बातमीमुळे तिचे चाहत्यांना आणि मित्र-परिवारालाही मोठाी धक्काच बसला. सोशल मीडियावर तिच्या अचानक जाण्यामुळे शोक व्यक्त केला जात आहे.

मेघा ठाकुरच्या आई-वडिलांनी पोस्ट शेअर करत लिहिलं, 'अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला कळवावे लागते की आमच्या आयुष्यातील प्रकाश, आमची लाडकी आणि सुंदर मुलगी मेघा ठाकूर अचानक आम्हाला सोडून गेली आहे. तिच्या जाण्यामुळे सर्वांनाच धक्कादायक आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी तिचं निधन झालं. 'मेघा एक आत्मविश्वासू आणि स्वतंत्र मुलगी होती. आम्हा सर्वांना तिची खूप आठवण येईल. तिचे तिच्या चाहत्यां वरखूप प्रेम होते आणि तिच्या निधनाची माहिती  तुम्हाला मिळावी अशी तिची इच्छा होती. यावेळी आम्ही तुमच्या मेघासाठी आशीर्वाद मागतो. तुमच्या प्रार्थना तिला तिच्या पुढील प्रवासात साथ देतील. मेघाचे आई-वडील.'

View this post on Instagram

A post shared by Megha (@meghaminnd)

मेघा ठाकूर वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी होती. ती सोशल मीडियावर बॉडी पॉझिटिव्हिटीचा प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध होती. जुलै 2022 मध्ये मेघाने तिला हृदयविकाराचा झटका आल्याची पोस्ट शेअर केली होती. यामागचे कारण तणाव आणि चिंता असल्याचं तिनं म्हटलं होतं.

दरम्यान, मेघा ठाकूरच्या कुटुंबीयांनी अद्याप तिच्या मृत्यूचे कारण सांगितलेले नाही. त्यांचे अंत्यसंस्कार 29 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी ब्रॅम्प्टन, ओंटारियो येथे झाले. मेघा ठाकूरचे कुटुंब मध्य प्रदेशातील इंदूरचे आहे. जेव्हा ती एक वर्षाची होती, तेव्हा ती तिच्या कुटुंबासह कॅनडाला गेली. सध्या तिचे चाहते खूप दुःखी असून तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तिच्या जुन्या पोस्टवर जाऊन कमेंटही करत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Tiktok, Tiktok star