'शोले 3 डी'भेटीला

" isDesktop="true" id="109866" >

02 जानेवारी : नवीन वर्षातला पहिला वीकेण्ड जवळ येतोय आणि या वीकेण्डला चांगल्या सिनेमांचे पर्याय आहेत. मराठी सिनेमा 'टाइमपास'चा मोठा चॉइस आहे.'टाइमपास' मध्ये केतकी माटेगांवकर आणि प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत दिसतील तर हा संपूर्ण सिनेमा 'बालक-पालक'कार रवी जाधवचा आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाची उत्सुकता लागून आहे. पहिल्या अल्लड प्रेमाची कहाणी टाइमपासमधून समोर येते. तर 1975च्या 'शोले' सिनेमाच्या चाहत्यांना खूप मोठी पर्वणी आहे ती 'शोले 3डी'ची.. भव्य दिव्य शोले आता 3डीमध्ये पाहता येणार आहे. तर बॉलिवूडचा 'मिस्टर जो बी करवालो' हा कॉमेडी सिनेमाही उद्या प्रदर्शित होतोय. अर्षद वारसी, सोहा अली खान, जावेद जाफरी यांची विनोदाची आतषबाजी पाहता येईल.

First published:

Tags: Prathmesh Parab, Priyadarshan Jadhav, Ravi Jadhav, TIME PASS, Time pass marathi movie, Time Pass Marathi Movie Promo, Time pass marathi movie song, Time pass marathi movie video