जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / ऑनलाईन गेमच्या नादात शेती विकली, 40 लाखही गेले, गावातली पोरंही वाया, जालन्यातील घटना

ऑनलाईन गेमच्या नादात शेती विकली, 40 लाखही गेले, गावातली पोरंही वाया, जालन्यातील घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या छोट्याशा गावात 30 ते 40 मुले या गेमच्या आहरी जाऊन बळी पडले आहे.

  • -MIN READ Local18 Jalna,Maharashtra
  • Last Updated :

रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना, 11 एप्रिल : सध्या अनेक मुलं मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळताना आपल्या निदर्शनास येत असतात आणि ऑनलाईन जुगाराला बळी पडून ते सर्वस्व गमावून बसतात. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळं तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

ऑनलाईन गेमच्या नादात एका तरुणाचे तब्बल 40 लाख रुपये गेल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या ढगी गावात घडला आहे. परमेश्वर केंद्रे, असे या तरुणाचे नाव असून त्याला गेमच्या आहारी शेत जमीनही विकावी लागली. परमेश्वरला मागच्या एक वर्षांपासून मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची सवय लागली. सुरुवातीला त्याने शंभर, हजार रुपयांनी हा गेम खेळला. यामध्ये त्याला पैसेही येऊ लागले. त्यानंतर तो हजारो रुपये यामध्ये गुंतवून तो गेम खेळू लागला. बघता बघता यामध्ये शेत जमीनही विकावी लागली असून यामध्ये त्याचे वर्षभरात तब्बल 40 लाख रुपये गेले आहेत. मॉस्ट बेट गेम काय प्रकार - मॉस्ट बेट हा गेम परदेशातल्या एका कंपनीनं तयार केला आहे. त्याला भारतात खेळण्यास परवानगी नाही. प्ले स्टोअरवर हा गेम उपलब्ध नसून तो तुम्हाला लिंकद्वारे डाऊनलोड करावा लागतो. यामध्ये गेमिंगचे अनेक प्रकार आहेत. सुरुवातीला हा आपल्याला बोनसचं अमिष दाखवून गेम खेळण्यास भाग पाडतो आणि हळू हळू आपण या गेमच्या आहारी जाऊन सर्वस्व गमावून बसतो. गेमिंग आणि जुगाराचा हा प्रकार

गेमिंग आणि जुगाराचा हा प्रकार

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणानं थेट पोलिसात धाव घेतली. मात्र, गुन्हा दाखल न करून घेता सायबर पोलिसांनी त्याला बँक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला आणि सायबर एक्सपर्टसारखी प्रतिक्रिया दिली. इतकंच काय तर या छोट्याशा गावात 30 ते 40 मुले या गेमच्या आहरी जाऊन बळी पडले आहे. इथले मुले वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन गेम खेळतात. अनेकांचे यामध्ये पैसेही गेलेत आहेत. परमेश्वरनं गेमच्या नादात रोडटच जमिन विकावी लागली. सध्या त्याची परिस्थिती हलाखीची आहे. गावातच एका छोट्या टपरीवर त्याच्या घरचा उदरनिर्वाह भागतो आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कुणी ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन बळी पडू नये, अन्यथा तुमच्यासोबत धक्कादायक घटना घडू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात