जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / कामावरुन काढल्याच्या रागातून मारहाण, चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

कामावरुन काढल्याच्या रागातून मारहाण, चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कामावरुन काढल्याच्या रागातून तरुणाला मारहाण केल्यानतंर भांडण सोडवायला आलेल्या कामगारांनाही धमकी (Threatening) देण्यात आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी, 24 मे : पुण्यातील पिंपरी (Pimpri) येथे एकाला मारहाणीची घटना घडली आहे. या घटनेचे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल, अशी ही घटना घडली आहे. एकाला कामावरुन काढण्यात आले होते. यानंतर ही घटना घडली. काय आहे घटना - कामावरुन काढल्याच्या रागातून तरुणाला मारहाण केल्यानतंर भांडण सोडवायला आलेल्या कामगारांना धमकी (Threatening) देण्यात आली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) कारवाई करत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण सोपान थिटे, असे मारहाणीत जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना चिंचवड येते 20 तारखेला दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय गोफणे, ओमकार गावडे दोन्ही (रा. शरदनगर, चिखली) यांच्यासह एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा -  Jalgaon Crowd Beating : वाहनाला कट लागल्याचे कारण, जमावाने केली मारहाण; जखमी महिलेचा मृत्यू फिर्यादी थेटे हे आपल्या कंपनीतील अधिकाऱ्यांसोबत चिंचवडमधील टाटा कंपनीच्या गेटवर आले होते. त्यावेळी किरण गोफणे याला कामावरुन काढल्याचा राग मनात धरून, अक्षय गोफणे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी थेटे यांना मारहाण केली. यानंतर त्यांना सोडवण्यासाठी काही कामगार तेथे आले असता त्यांनाही धमकी देण्यात आली. आरोपी अक्षय गोफणे म्हणाला की, तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे, माझ्या नादाला लागलात तर कामावर येऊ देणार नाही, अशी धमकी त्याने यावेळी दिली. तसेच तुला जिवंत सोडणार नाही, असे फिर्यादीत म्हटले गेले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात