Home /News /crime /

सासरी हुंड्यासाठी तगादा तर नवरा म्हणायचा मूल माझं नाहीच, जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

सासरी हुंड्यासाठी तगादा तर नवरा म्हणायचा मूल माझं नाहीच, जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

या महिलेला 7 महिन्यांची मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यापासून पती नेहमी ही माझी मुलगी नाहीच म्हणत मानसिक त्रास देत होता. तर हुंड्यासाठी सासरचे लोक तिला मारहाण करायचे.

    पाली, 05 सप्टेंबर : सासरी हुंड्यासाठी होणारा त्रास (woman harassment) आणि पतीच्याही असहकार्याच्या भूमिकेमुळं कंटाळलेल्या महिलेनं तिच्या माहेरी आत्महत्या केल्याची (Young woman commits suicide) धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेला 7 महिन्यांची मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यापासून पती नेहमी ही माझी मुलगी नाहीच म्हणत मानसिक त्रास देत होता. तर हुंड्यासाठी सासरचे लोक तिला मारहाण करायचे. यामुळे तिनं नैराश्यात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. माहेरीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा सर्व प्रकार राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील फालना येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फालनाच्या इंदिरा कॉलनीत राहणाऱ्या ममताचे दोन वर्षांपूर्वी फालना येथील रहिवासी नवल किशोर खरवाल याच्याशी लग्न झाले होते. नवल किशोर रेल्वेमध्ये काम करतो. ममताने बीएससी-बीएडही केले आहे. तिच्या वडिलांप्रमाणे तिला शिक्षिका व्हायचे होते. नवल हा नेहमी मुलगी माझी नाहीच, असा टोमणा मारत असे. म्हणून तो जन्मानंतर मुलीला पाहायलाही आला नव्हता. ममताचे वडील कांतीलाल सिसोदिया यांनी सांगितले की, तिचे सासरे तिला हुंड्यासाठी त्रास देत असत. अनेक वेळा त्याला मारहाणही केली. शुक्रवारी मुलीने अस्वस्थ होऊन आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनी फालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. तीन महिने माहेरी होती ममता गेल्या तीन महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत होती. शुक्रवारी आत्महत्या करण्यापूर्वी ती तिच्या खोलीत गेली. सर्वजण घरातच होते. बराच वेळ ती बाहेर आली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला. दार उघडले नाही तेव्हा त्यांनी खोलीत प्रवेश केला तर तिथे ममता बेशुद्ध पडली होती. तिला फालना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पतीने साथ दिली नाही फालना येथील माळी समाज वसतिगृहाजवळ राहणारे कांतीलाल सिसोदिया यांनी सांगितले की, त्यांची मुलगी ममता सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. B.Sc केल्यानंतर तिनं 2019 मध्ये B.Ed केलं. तिनं 22 नोव्हेंबर 2019 रोजी नवल किशोरशी लग्न केलं. लग्नानंतर काही वेळातच तिच्या सासरच्यांनी तिला त्रास देणं सुरू केलं. ममताच्या वडिलांनी सांगितले की तिला शिक्षिका व्हायचे होते आणि तिनं तिच्या सासरच्यांना कोचिंगसाठी विचारले पण त्यांनी असे सांगितले की त्यांंना नोकरी करणारी सून नको आहे. शिक्षण होण्याच्या तिच्या स्वप्नाविषयी सर्व काही माहीत असूनही नवऱ्याने तिला साथ दिली नाही. हे वाचा - फ्लाइट पकडण्यासाठी तरुणीचा कहर; केवळ Bikini घालून विमानतळावर मारली एन्ट्री, पाहा VIDEO कोणी मुलीचा चेहरा बघायलाही आले नाही लग्नानंतर ममताने 2 फेब्रुवारी 2021 रोजी मुलीला जन्म दिला. ममताच्या वडिलांनीही तिच्या सासरच्यांना याबाबत माहिती दिली, पण केवळ दोन किलोमीटर दूर असतानाही ममताचा पती आणि त्याच्या कुटुंबातील कोणीही मुलीचा चेहराही बघायला आले नाहीत. जेव्हा जेव्हा सासरच्या लोकांना मुलीला बघण्यासाठी येण्यास सांगितले. तेव्हा सासरचे लोक, तिला मुलगा झाला असता तर बरे झाले असते, असे म्हणत टोमणा द्यायचे सासरच्यांच्या या वृत्तीमुळे ममता खूप दुखावली होती. प्रसूतीला दोन महिने झाले तरी ममताला घेण्यासाठी तिच्या सासरच्यांकडून कोणी आले नाही. या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली. तिच्या पाठिमागं 7 महिन्यांची मुलगी असल्यानं परिसरात सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Woman harasment, Woman suicide

    पुढील बातम्या