मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पबजीच्या नादात तरुणानं खरोखर 500 फूट खोल दरीत मारली उडी, नंदुरबारमधील धक्कादायक घटना

पबजीच्या नादात तरुणानं खरोखर 500 फूट खोल दरीत मारली उडी, नंदुरबारमधील धक्कादायक घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Suicide while playing PUBG: नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी याठिकाणी एका विचित्र घटना समोर आली आहे. पबजी गेममध्ये मग्न झालेल्या एका तरुणानं थेट 500 फूट खोल दरीत उडी (jump into 500 foot deep valley) मारली आहे.

ब्राह्मणपुरी, 10 मार्च: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी याठिकाणी एका विचित्र घटना समोर आली आहे. पबजी गेममध्ये (PUBG Game) मग्न झालेल्या एका तरुणानं थेट 500 फूट खोल दरीत उडी मारली (jump into 500 foot deep valley) आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित तरुणाचा भयावह अंत झाला आहे. मंगळवारी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तरुणानं हे कृत्य केलं आहे. बुधवारी दुपारी तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आहे. तरुणानं अशाप्रकारे आत्महत्या (Suicide) केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजय जुलेश ठाकूर असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी मृत विजयचे आई वडील देवदर्शनासाठी देवमोगरा याठिकाणी गेले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी मृत विजय आपल्या काही मित्रांसोबत थंड हवेचं ठिकाणी असणाऱ्या तोरणमाळ परिसरात फिरायला गेला होता. यावेळी 22 वर्षीय विजयने अचानक 500 फूट खोल सीताखाईत उडी घेतली.

हेही वाचा-शेजारील तरुणावर जडलं प्रेम; महिलेनं प्रियकराच्या मदतीनं शिक्षक पतीचा वाजवला गेम

मंगळवारी रात्री उशिरा 9 च्या सुमारास अतिदुर्गम भागात ही घटना घडल्यानं विजयला दरीतून बाहेरही काढता आलं नाही. बुधवारी दुपारी काही स्थानिकांच्या मदतीनं विजयचा मृतदेह दरीतून बाहेर काढला आहे. मंगळवारी रात्री मित्रांसोबत सीताखाई पॉइंटवर गेल्यानंतर, पबजी खेळण्याच्या नादात विजयने 500 फूट खोल दरीत उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.

हेही वाचा-बहिणीच्या लग्नाआधीच नियतीनं साधला डाव, नाशकात शेतकरी भावाचा तडफडून अंत

दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी ठाण्यातील वर्तकनगर परिसरात पबजी गेम हरवण्यावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जानकादेवी मंदिर परिसरात असलेल्या जुनी पाईपलाईनजवळ राहणाऱ्या आरोपी प्रणव कोळी आणि दोन्ही अल्पवयीन मुलांनी साहिल नावाच्या एका तरुणाची चाकू, सुरा आणि इतर तीक्ष्ण हत्यारांनी वार करत हत्या केली होती. काही दिवसांपूर्वी पब्जी खेळात एकमेकांना हरवण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून त्यांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

First published:
top videos

    Tags: Crime news, PUBG, Suicide