जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / लग्नाच्या 4 दिवस आधीच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, आढळली या अवस्थेत

लग्नाच्या 4 दिवस आधीच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, आढळली या अवस्थेत

तरुणीची आत्महत्या

तरुणीची आत्महत्या

लग्नाच्या चार दिवस आधी तरुणीने धक्कादायक निर्णय घेतला.

  • -MIN READ Local18 Sagar,Madhya Pradesh
  • Last Updated :

अनुज गौतम, प्रतिनिधी सागर, 3 जून : ज्या घरातील मुलीचे लग्न होणार त्याच मुलीची लग्नाच्या चार दिवस आधी प्रेतयात्रा निघाली. ज्या घरात लग्नाच्या निमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते, त्याच घरात आता दु:खाचे वातावरण आहे कारण, लग्नाच्या चार दिवस आधीच तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आणि आपले जीवन संपविले. काय आहे संपूर्ण प्रकरण - लग्नाच्या अवघ्या 4 दिवस आधी एका मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुंदेलखंडमधील सागर जिल्ह्यात घडली. सागर जिल्ह्यातील खिमलासा येथील गिरहनी गावात राहणारे कुटुंब काही दिवसांपासून आपल्या मुलीच्या लग्नासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होते. यादरम्यान, त्यांनी यूपीच्या ललितपूर जिल्ह्यातील तालबेहट येथील एक मुलगा पाहिला आणि तिच्या वडिलांनी नातेवाईकांसह मुलाच्या घरी जाऊन लग्न ठरवले. तसेच पंडितजींनी लग्नाचा शुभ मुहूर्त म्हणून 5 जून ही तारीख निश्चित केली. या मुहूर्तावर दोन्ही कुटुंबीयांनी लग्न करण्याचे मान्य केले. यानंतर तो आपल्या घरी परतला आणि कुटुंबीय लग्नाच्या तयारीत गुंतले.

News18लोकमत
News18लोकमत

दुसऱ्या दिवशी चंदा या 18 वर्षीय तरुणीने सायंकाळी उशिरा राहत्या घरी दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. लहान मुलांनी ते पाहताच नातेवाइकांना बोलावले. यानंतर त्यांनी ताबडतोब तिला रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यानंतर या घटनेची माहिती खिमलासा पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तरुणीने हे पाऊल का उचलले याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. पण ती लग्नाच्या नात्यावर खूश नव्हती, कदाचित त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस काय म्हणाले - खिमलासा पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशांत सेन यांनी सांगितले की, तरुणीचे लग्न ठरले आहे, तिने हे कृत्य का केले याचे कारण समोर आले नाही. तर पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात