मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

विदेशात जायचं स्वप्न पाहत होती तरुणी, ट्रॅव्हल एजंट्सने पाजली दारू, ड्रग्जच्या अतिसेवनाने घडलं भयानक

विदेशात जायचं स्वप्न पाहत होती तरुणी, ट्रॅव्हल एजंट्सने पाजली दारू, ड्रग्जच्या अतिसेवनाने घडलं भयानक

निशा राणा (फाईल फोटो)

निशा राणा (फाईल फोटो)

निशाला परदेशात सेट व्हायचं होतं. 15 नोव्हेंबर रोजी निशाने तिची बहीण सपनाला सांगितले की, ती आज रात्री जालंधरचे रहिवासी ट्रॅव्हल एजंट अजय आणि मानवगीत सिंग यांना भेटणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Himachal Pradesh, India
  • Published by:  Khushalkant Dusane

कांगडा, 19 नोव्हेंबर : देशात तरुणाईला ड्रग्जचे सेवन खूप महागात पडत आहेत. याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतरही आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील तरुणीचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला आहे. तरुणीच्या बहिणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा फरार आहे. सध्या मोहाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2022 रोजी मोहाली पोलिसांना झिरकपूर-डेराबस्सी रोडजवळ शताबगढ रोडवर शेतात उभ्या असलेल्या पोलो कारमधून एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. निशा राणा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती कांगडा येथील रहिवासी होती. मात्र, ती तिच्या आई-वडिलांसोबत डेराबस्सी येथे राहत होती.

मृत निशा राणा हिच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, निशा तिचे वडील आणि लहान बहीण सपनासोबत डेराबस्सी येथे राहत होती. तिची आई ऑगस्ट 2022 मध्ये कांगडा, हिमाचल येथे आपल्या मुलासोबत राहायला गेली. निशाला परदेशात सेट व्हायचं होतं. 15 नोव्हेंबर रोजी निशाने तिची बहीण सपनाला सांगितले की, ती आज रात्री जालंधरचे रहिवासी ट्रॅव्हल एजंट अजय आणि मानवगीत सिंग यांना भेटणार आहे.

खूप दिवसांपासून ते तिला भेटण्यासाठी बोलवत होते. यानंतर दोन्ही तरुण निशाला घेऊन खरार सेक्टर-118 येथील शांतीसागर हॉटेलमध्ये गेले. तेथे दोघांनी निशाला दारू पाजली. यादरम्यान दारू आणि ड्रग्जच्या अतिसेवनामुळे तिचा मृत्यू झाला. रात्रभर दोघेही त्याला इकडे-तिकडे गाडीत घेऊन जात राहिले. मात्र, उपचारासाठी तिला रुग्णालयात नेले नाही. दोघांनी निशाचा फोनही फोडल्याचा आरोप अमिताने केला आहे. जिरकपूर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पोस्टमार्टममध्ये निशाचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार, विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर आरोप; घटनेने खळबळ

दिल्लीतील रहिवासी मृताची बहीण अमिता हिच्या जबानीवरून पोलिसांनी भादंवि कलम 304, 201, 34 अन्वये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका तरुणाला अटक केली आहे. अजय (रा. आदमपूर, जालंधर) आणि मानवगीत सिंग (रा. सुलतानपूर लोधी कपूरथला), अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी मानवगीत सिंगला अटक केली आहे. हा पोलो कार शेतात टाकून पळून गेला होता. याला धर्मकांते येथे काम करणाऱ्या काका राणाने पाहिले होते. तर आरोपीला आज शनिवारी डेराबस्सी कोर्टात हजर केले जाईल, तर दुसरा साथीदार अजयच्या शोधात पोलिस छापे टाकत आहेत.

रोडीज मध्ये घेतला होता सहभाग -

मृताची बहीण अमिता हिने सांगितले की, निशा राणाने 2007 च्या एमटीव्ही रोडीजच्या सीझनमध्ये देखील भाग घेतला होता. ती रोडीज सीझन 7 ची स्पर्धक होती. डेराबस्सी येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांच्या पथकाने शुक्रवारी निशा राणाचे शवविच्छेदन करण्यात आले. सध्या या घटनेचा पोलीस कसून तपास सुरू आहेत.

First published:

Tags: Crime news, Death, Drugs, Girl death, Himachal pradesh, Punjab