चंदीगड, 02 सप्टेंबर : आठ लग्न करून आता ननव्या लग्नाच्या (Fake Marriage news) तयारीत असलेल्या एका तरुणीला तिच्या टोळीसह पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, धक्कादायक म्हणजे या तरुणीच्या केलेल्या वैद्यकीय चाचणी तिची HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली आली आहे. त्यामुळं आता पोलिसांसमोर या लुटारू तरुणीच्या अगोदरच्या आठ पतींना शोधून काढण्याचे आव्हान असून त्या सर्वांची HIV टेस्ट करावी लागणार आहे. तिच्या अगोदरच्या नवऱ्यांनाही HIV ची लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या तरुणीच्या संपर्कात असलेल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही लुटारू तरुणी आपल्या 3 साथीदारांसह एक टोळी तयार करून तरुणांना फसवत असे. लग्नानंतर (Fake Marriage) आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव करायची आणि हुंड्याची मागणी करत भांडण करायची आणि नंतर पंचायत बोलवायची. घटस्फोट दिल्यानंतर ती सासरच्या कुटुंबातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जायची. या कामात तिची आई सुद्धा तिला साथ देत असे. फसवणूक झालेले 8 पैकी 3 वर हरियाणाचे आहेत. पटियालाच्या जुल्का परिसरात नवव्या वराच्या शोधात असताना तिला पकडण्यात आले. इथेही तिचे लग्न झाले असून ती हनिमूनहून एक आठवड्यानंतर आली आहे. अशा परिस्थितीत तिच्याकडून फसवणूक झालेल्या नवऱ्यांसमोर एड्सचा धोका निर्माण झाला आहे. हा सर्व प्रकार पंजाब आणि हरियाणामध्ये घडला आहे. आरोपी तरुणीेचे वय 30 वर्षे आरोपी महिला हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे वय 30 वर्षे आहे. आरोपी महिलेचे खरे लग्न 2010 मध्ये पटियाला येथे झाले, ज्यातून तिला तीन मुले झाली. त्यांचे वय आता 7 ते 9 वर्षांच्या दरम्यान आहे. यानंतर अचानक तिचा नवरा गायब झाला. या वधूने आपल्या पतीला घटस्फोटही दिला नाही. चार वर्षांपूर्वी तिने तरुणांची जणू फसवणूक करण्याचा व्यवसायच सुरू केला. त्यानंतर पंजाब आणि हरियाणातील अविवाहित, घटस्फोटित किंवा विधूर पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवून तिनं फसवणूक सुरू केली. हे वाचा - इथं लग्नाआधी नवरदेवाला सिद्ध करावा लागतो आपला पुरुषार्थ; नवरीच्या काकीसोबत ठेवावे लागतात शारीरिक संबंध नवव्या लग्नाच्या तयारी असताना सापडली ही लुटारू वधू 8 लग्न करून 9 वे लग्न करण्याची तयारी करत होती. यासाठी ती तिच्या टोळीसह देवीगडला पोहोचली होती. तेथे मात्र हे सर्व जुल्का पोलीस ठाण्याच्या तावडीत अडकले. पाच दिवसांपूर्वी पकडलेल्या या टोळीची चौकशी केल्यानंतर आरोपींनी पंजाब व्यतिरिक्त हरियाणामध्येही जाळे पसरल्याचे तपासातून समोर आले आहे. ही टोळी 30 ते 40 वयोगटातील घटस्फोटित आणि अविवाहित लोकांचा शोध घेऊन फसवणूक करायचे. ही तरुणी HIV बाधित निघाल्यानं फसवणूक झालेल्यांसमोर अजून एक मोठं संकट उभा राहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.