मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /महिला डॉक्टरची आत्महत्या; बेडरुममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

महिला डॉक्टरची आत्महत्या; बेडरुममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बिहारच्या शेखपुरामध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टर (Famous Doctor Shekhpura) आणि निवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. एम. पी. सिंह यांच्या मुलगी नेत्रतज्ञ डॉ. बरखा सोलंकी यांनी आत्महत्या केली आहे.

शेखपुरा, 9 मे : बिहारच्या शेखपुरामध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टर (Famous Doctor Shekhpura) आणि निवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. एम. पी. सिंह यांच्या मुलगी नेत्रतज्ञ डॉ. बरखा सोलंकी यांनी आत्महत्या (Female Doctor Suicide Shekhpura) केली आहे. बरखा यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

डॉ. बरखा सोलंकी या नेत्रतज्ञ म्हणून रुग्णालयात कार्यरत होत्या. मृत बरखा यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांचे पतीसुद्धा व्यवसायाने डॉक्टर आहेत. बरखा या शेखपुरा येथे त्यांच्या माहेरी राहत होत्या. त्यांचे पतीसुद्धा इथेच राहत होते. दोन्ही पती-पत्नी मिळून एक क्लिनिक चालवत होते. आत्महत्यचे कारण अजून समोर आलेले नाही. मात्र, पती-पत्नीमध्ये व्यवसायावरुन घरघुती वाद होते. हा वाद इतक्या टोकाला गेला की, डॉ. बरखा सोलंकी यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

हेही वाचा - डेहरादून-हरिद्वारसह 6 रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी, रेल्वे अधीक्षकांना आले पत्र

दरम्यान, आत्महत्येच्या घटनेची माहिती होताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

घरातील किरकोळ कारणावरुन वाद, नवविवाहितेने उचलले धक्कादायक पाऊल

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या (Suicide) केली आहे. घरातील किरकोळ कारणावरुन ही आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. आशा विशाल इंगळे असे मृत विवाहित तरुणीचे नाव आहे. तर याप्रकरणी, जळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशा विशाल इंगळे या पती विशाल, सासू, सासरे आणि दीर यांच्यासह वास्तव्याला होती. तिचा पती विशाल मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो. विशाल आणि दोन भाऊ सोबत एकत्रच राहतात. शनिवार रोजी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यामुळे संतापाच्या भरात आशा इंगळे यांनी काल घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

First published:

Tags: Bihar, Suicide news, Woman doctor, Woman suicide