Home /News /crime /

विषारी इंजेक्शन घेत अमरावतीतील महिला डॉक्टरची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

विषारी इंजेक्शन घेत अमरावतीतील महिला डॉक्टरची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

अमरावती येथील एक महिला डॉक्टरने आत्महत्या (woman doctor suicide) केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने ज्या पद्धतीने आत्महत्या केली, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

    अमरावती, 22 एप्रिल : अमरावती येथील एक महिला डॉक्टरने आत्महत्या (woman doctor suicide) केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने ज्या पद्धतीने आत्महत्या केली, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. डॉ. प्रियंका दिवाण असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्या साई हेल्थ केअर अॅन्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज दिवाण यांच्या पत्नी होत्या. विषारी इंंजेक्शन लाऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी या घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका यांचे लग्न ऑगस्ट 2009 मध्ये झाले होते. मात्र, त्यांना मुलबाळ नसल्याने त्या तणावात होत्या. याचमुळे त्यांनी हे धक्कादायक पाऊल उललले आहे. मात्र, महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी डॉ. पंकज दिवाण यांच्यावर गंभीर आरोप करत ती आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री बेडरूममध्ये झोपलेल्या महिला डॉक्टर सकाळी उशिरापर्यंत उठल्या नाहीत. तेव्हा कुटुंबीय घाबरुन गेले. डॉ. पंकज दिवाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर जेव्हा ते दरवाजा तोडून आतमध्ये गेले, त्यावेळी प्रियंका त्यांना त्याठिकाणी मृतावस्थेत पडलेल्या आढळून आल्या. हे वाचा - कपलने अवघ्या 100 रुपयांत खरेदी केलं घर; खोलीतून बाहेर पडताच समोरचं दृश्य पाहून बसला धक्का याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मात्र, महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानंतर आता अकोला वैद्यकीय महाविद्यालयात 5 डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पुढील कारवाईसाठी पोलीस आता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या की आत्महत्या, याचे गूढ शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच उकलणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Suicide, Woman suicide, महाराष्ट्र amravati

    पुढील बातम्या