खोपोली, 29 मार्च : अभिनेता अमिर खान याच्या सिनेमातील 'आती क्या खडांला' या गाण्याला अनुसरुन खोपोली (Khopoli)तील डाँमिनोजमध्ये (Dominos) आती क्या रुम पर घडत असल्याचा प्रकार समोर आला. आती क्या रुम पर म्हणत महिलेचा विनयभंग करणाऱ्या व्यवस्थापकाला चांगलीच अद्दल घडवली आहे.
24 मार्च 2022 रोजी आरोपी संतोष लछिराम यादव (वय 35 वर्षे) हा तेथील महिला कर्मचारीचा विनयभंग करत होता. या संदर्भात पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिलेला 'तु मेरे साथ मेरे रूम पर चल, मेरे रूम पर कोई नही. तूझे अकेले में बात करनी है' असे सतत बोलून कामात हिणवत असे. या प्रकाराला कंटाळलेल्या महिला कर्मचारीने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली.
खोपोली ते शिळफाटा दरम्यान ईन्फिनिटी या इमारतीत तळ मजल्यावर दर्शनी भागात जगविख्यात ब्रँन्ड डाँमिनोज या पिझ्झा शाँपमध्ये तक्रारदार महिला आणि आरोपी दोघेही कामाला आहेत. तक्रारदार महिलेकडे आरोपी संतोष यादव याने डॉमिनोज पिझ्झा येथील डयूटी रजिस्टर दाखवण्याची मागणी केली. त्यावेळी रजिस्टर दाखवत असताना तक्रारदार महिलेच्या हाताला आरोपी संतोष यादव याने अश्लील स्पर्श करून 'तू व्यवस्थीत काम करत नाहीस तसेच माझे समाधान देखील करत नाहीस' असे बोलून तक्रारदार हिचे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या बद्दल महीलेने आरोपी विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
वाचा : घरी बनवलेली मच्छी देण्यास दिला नकार, माथेफिरूने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करत काढला काटा
27 मार्च रोजी सध्यांकाळी तक्रारदार महिला कामावर असताना तिने आपल्या पतीला आरोपीच्या त्रासाबद्दल माहिती दिली. त्यानंतर तिच्या पतीने सदर प्रकार काही पत्रकारांच्या कानावर घातल्याने लागलीच काही पत्रकार तिथे पोहचले. त्यावेळे डाँमिनोज पिझ्झातील स्टाफकडे याबाबत माहिती विचारली असता सर्व स्टाफ हे फोन वर वरिष्ठांच्या सपंर्कात होते. तसेच ईतर महिला कर्मचारी देखील तक्रारदार महिलेला वरिष्ठांशी बोलण करुन देऊन तक्रार न देण्यास भाग पाडत असल्याचे चित्र स्पष्ट होत होते.
या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार करताच पोलिसांनी आरोपी संतोष यादव याला अटक केली. त्याच्या विरोधात भादवि कलम 354, 509 अतंर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करुन पुढील तपास करत आहे. परंतु आरोपी हा डाँमिनोज पिझ्झाच्या खोपोली आऊटलेट मधील वरिष्ठ अधिकारी असल्याने व्यवस्थापनाकडून आपल्याला न्याय मिळणार नाही, प्रसंगी नोकरी सोडण्या करीता दबावच येईल. या कारणारे संतोष यादव याच्या आत्याचारला त्रासलेल्या महिलेले धीटपणाने अखेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिल्याने अखेल आरोपीला अटक झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.