जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / तरुणीने OLX वर जाहिरात टाकली अन् गमावले 1 लाख, IDBI बँकेला कळवलं; मात्र...

तरुणीने OLX वर जाहिरात टाकली अन् गमावले 1 लाख, IDBI बँकेला कळवलं; मात्र...

तरुणीने OLX वर जाहिरात टाकली अन् गमावले 1 लाख, IDBI बँकेला कळवलं; मात्र...

पीडितेने OLX वर आपलं फर्निचरचं सामान विकण्यासाठी पोस्ट टाकली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 15 एप्रिल : हरयाणातील (Haryana News) बहादुरगडमधील एका तरुणीसोबत 1 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेने OLX वर आपलं फर्निचरचं सामान विकण्यासाठी पोस्ट टाकली होती. खरेदीदार होऊन आरोपीने क्यूआर कोड पाठवलं आणि खात्यातून कॅश साफ केली. या प्रकरणात सिटी पोलिसांनी FIR दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादूरगड शहरातील रेल्वे रोडजवळील संत कॉलनीत राहणारी निधी मदान हिने आपल्या फर्निचरचं काही सामान विकण्यासाठी ऑनलाइन साइट OLX वर एक पोस्ट टाकली होती. काही दिवसांपूर्वी एका अज्ञान व्यक्तीने OLX चॅट बॉक्सवर तिच्यासोबत संपर्क केला. तरुणीने आपला मोबाइल नंबर त्या व्यक्तीला दिला आहे. व्यक्तीने फर्निचर खरेगी करून संवाद सुरू केला. दोघांमध्ये फर्निचरचा करारही करण्यात आला.

जाहिरात

हे ही वाचा- मसाज पार्लरमध्ये अशा स्थितीत दिसले तरुण-तरुणी; महिला आयोगाचे सदस्यही शरमले

यानंतर आरोपीने फर्निचरची रक्कम पाठवण्याच्या नावाखाली निधीच्या व्हॉट्सअॅनप एक क्यूआर कोड पाठवला. पेटीएमच्या माध्यमातून तो स्कॅन करताच पहिल्यांदा निधीच्या खात्यातून 20 हजार रुपये कापले गेेले. यानंतर तिने आरोपीशी संपर्क केला आणि पैसे कापले गेल्याची माहिती दिली. यावेळी आरोपीने पैसे परत पाठवण्याचा विश्वास दिला. यानंतर त्याने पुन्हा क्यूआर कोड पाठवला. जो स्कॅन करताच पुन्हा तिच्या अकाउंटमधून 20 हजार रुपये गेले.

40 हजार आणि यानंतर 19 हजार 958 आयडीबीआय बँकेतून कट झाले. एकूण 99 हजार 958 रुपये कापल्यानंतर निधीला संशय आला. तिने बँकेशी संपर्क केला तर तिच्यासोबत फसवणूक झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात