कुंदन कुमार, प्रतिनिधी गया, 9 जून : सध्या जिल्ह्यात एक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीचा खून झाला. तर सातव्या दिवशी तिच्या प्रियकराचा (मावस मेहुणा) मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. पतीचा खून आणि मेहुण्याचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - असे बोलले जात आहे की, वधू रेवंती कुमारीचे तिच्या मावस बहिणीच्या नवऱ्याशी अनैतिक संबंध होते. ही बाब तिचा पती अशोक कुमार याला समजली. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अशोक आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याचे पाहून त्याची हत्या करण्यात आली. 31 मे रोजी अशोकची हत्या करण्यात आली. यानंतर प्रियकर उपेंद्र यादव याचा मृतदेह 6 जून रोजी संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. पण अजून उपेंद्रच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ही घटना गया जिल्ह्यातील लकडाही गावातील आहे. याठिकाणी गेल्या 31 मेला अशोक कुमारची हत्या करण्यात आली. यानंतर 1 जूनला जवळच्या गावातील एका कालव्याजवळ त्याचा मृतदेह मिळाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलीस तपासात समजले की, अशोक कुमार याच्या पत्नीनेच त्याच्या हत्येचा कट रचला. अशोक कुमारची बायको रेवंती कुमारी हिचे तिच्या मावस मेहुणा उपेंद्र यादवसोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान, रेवंती कुमारीचे अशोक कुमारसोबत 29 मे रोजी लग्न झाले. यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिचा नवरा अशोक कुमारची हत्या करण्यात आली आणि हत्येनंतर त्याचा मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून देण्यात आला. पोलिसांचा दावा - गया पोलिसांनी याप्रकरणी मोठा दावा केला आहे की, लग्नानंतर अशोक कुमारची बायको हिने अशोक कुमारच्या हत्येचा कट रचला होता. त्यात 6 जून रोजी रेवंती कुमारीचा मावस मेहुणा उपेंद्र कुमार यादव याचा मृतदेह अमास पोलीस स्टेशन परिसरातून संशयास्पद स्थितीत आढळला. उपेंद्रचा मृत्यू कसा झाला याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, असं बोललं जात आहे की, अशोकच्या हत्येत उपेंद्र यादवचा हात होता आणि अशोकची हत्या केल्यानंतर 6 जून रोजी त्याने स्वतःही सल्फासची गोळी खाऊन आत्महत्या केली. जिथून उपेंद्र यादवचा मृतदेह सापडला, तिथे उलटी केल्याचे आढळले. मात्र, उपेंद्रचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या हत्येचे गूढ तपासत आहेत. यासंदर्भात एसएसपी आशिष भारती यांनी सांगितले की, अशोकच्या हत्येप्रकरणी एसआयटी टीम तयार करण्यात आली. यादरम्यान पत्नी रेवंती कुमारीची भूमिका संशयास्पद असून चौकशी करण्यात आली. चौकशीत रेवंतीने गुन्ह्याची कबुली दिली. अशोकला तिच्या आणि उपेंद्रच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली होती. त्यामुळेच त्याला मार्गावरून हटवण्यात आले. सध्या गया पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून उपेंद्रच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.