मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बागेश्वर बाबाच्या दरबारात नेऊ शकला नाही पती, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

बागेश्वर बाबाच्या दरबारात नेऊ शकला नाही पती, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

संदीपची पत्नी पल्लवी ही नेहमी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींची प्रवचने ऐकायची. घरातील समस्या दूर होण्यासाठी धीरेंद्र शास्त्री जे काही सांगायचे ते पल्लवी करायची.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

भोपाळ, 01 एप्रिल : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये बागेश्वर धाम यांच्यावर श्रद्धा असलेल्या महिलेनं रागाच्या भरात आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कंचनपूर इथं राहणाऱ्या पल्लवी चौधरीने गळफास घेत आत्महत्या केली. धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात पतीने नेलं नाही म्हणून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. पल्लवीची दोन लहान मुले असून तिच्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अधारतल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंचनपूर भागात संदीप चौधरी पत्नी पल्लवी, दोन लहान मुले आणि आईसह राहतात. आईला गंभीर आजार असून कुटुंबाची आर्थिक स्थितीही बेताची आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करत असलेल्या संदीपची पत्नी पल्लवी ही नेहमी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींची प्रवचने ऐकायची. घरातील समस्या दूर होण्यासाठी धीरेंद्र शास्त्री जे काही सांगायचे ते पल्लवी करायची.

आधी फ्लॅटवर बोलावलं, सोबत फोटो काढला अन् नंतर..., पुणेकर व्यापाऱ्यासोबत घडलं भयंकर

पल्लवीने २७ मार्च रोजी पतीकडे हट्ट केला की पनागरमध्ये होणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात जायचं आहे. मात्र आईच्या उपचारासाठी पती संदीप रुग्णालयात गेला. डॉक्टरांची भेट न झाल्यानं त्यांना येण्यास उशीर झाला. त्यावेळी घरात प्रवचनाला जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या पल्लवीने रागाच्या भरातच घरात गळफास घेतला.

पती संदीपने सांगितलं की, या घटनेनंतर शेजाऱ्यांसोबत मिळून घराचा दरवाजा उघडला. पल्लवी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल कऱण्यात आली असून अधिक तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bhopal News, Madhya pradesh