हल्द्वानी, 24 जुलै : उत्तराखंडमधील हल्दवानी येथील प्रसिद्ध अंकित चौहान हत्याकांड समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली आर्या उर्फ माही सिंग हिला पोलिसांनी अटक करण्यात आली असून तिने याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. माहीसोबत तिचा प्रियकर दीप कंदपालही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांच्या अटकेनंतर डीआयजी कुमाऊं नीलेश आनंद भरणे, एसएसपी नैनीताल पंकज भट्ट आणि सीओ सिटी हल्द्वानी भूपेंद्र सिंह धोनी यांनी खुलासा करत सांगितले की, दोघांनाही रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. 14 जुलै रोजी अंकितची हत्या करून दोन्ही मुख्य आरोपी फरार झाले होते. मात्र, या हत्याकांडातील आरोपी सर्पमित्राला यापूर्वीच पोलिसांनी पकडले. पोलिसांनी 18 जुलै रोजी रमेश नाथ नावाच्या या सर्पमित्राला अटक केली होती. यानंतर त्याने या संपूर्ण खुनाची माहिती दिली होती.
मृत अंकित चौहान हा व्यवसायाने व्यापारी होता. रामपूर रोडवर ऑटो एम्पायर नावाचे त्याचे शोरूम होते. तसेच खानचंद मार्केटमध्ये चौहान कुटुंबाचे एक हॉटेलही आहे. दरम्यान, 14 जुलै रोजी अंकितचा मृतदेह त्याच्या कारच्या मागील सीटवर पडलेला आढळून आला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. मृत अंकितच्या शवविच्छेदनानंतर पोलिसांनी कसुन तपास केला. यावेळी मृताच्या दोन्ही पायांच्या मागील भागात दोन वेळा सर्पदंशाच्या खुणा आढळून आल्या. शवविच्छेदन अहवालातही सर्पदंशाने हा मृत्यू झाला आहे, अशी पुष्टी डॉक्टरांनी केली होती. त्यामुळे अंकितच्या मृत्यूचे कारण संशयास्पद वाटू लागले. यानंतर सर्व बाजूने पोलिसांना तपास केला असता, अंकित चौहानचा खून हा अतिशय विचारपूर्वक आखलेला कटातून करण्यात आला. माहीला अंकितसोबत लग्न करायचे होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. नैनिताल जिल्ह्याचे एसएसपी पंकट भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आणि मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक दिल्ली, हरियाणा, नेपाळ, बिहार आणि राज्याच्या आरोपींच्या मागावर होते. यात चार फरार आरोपी माही उर्फ डॉली, दीपू कंदपाल, राम अवतार, उषा देवी यांच्यावर 25,000 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, माही उर्फ डॉली आणि दीपू कांडपाल यांना अटक करण्यात आली. माही उर्फ डॉली ही तिच्या कुटुंबासह प्रेमपूर लोसग्यानी येथे राहत होती. दरम्यान, 2008 मध्ये बालपणीच्या प्रियकराने फसवणूक केल्यामुळे तिने घर सोडले आणि यानंतर ती वेगळे राहू लागली. यादरम्यान ती हल्दवानी पूर्वेला चुकीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या संपर्कात आली. यानंतर 2016 मध्ये त्याची भेट मोटाहल्दू येथील रहिवासी दीप कंदपाल याच्याशी झाली आणि यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांचे इतके संबंध घनिष्ठ झाले की, तो तिला घरच्या कामात मदत करू लागला. आणखी पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर, यादरम्यान माही आणि दीप कंदपाल दोघांनी एकमेकांसोबत शारीरिक संबंधही ठेवले. माहीने 2017 मध्ये अर्जुनपूरमध्ये प्लॉट खरेदी करून स्वतःचे घर बांधले. दरम्यान, 2020 मध्ये हल्दवानी येथील ओळखीच्या एका व्यक्तीच्या मदतीने गाडी खरेदीच्या निमित्ताने तिची अंकितशी भेट झाली. यानंतर अंकित आणि माही या दोघांमध्ये मैत्री झाली. यानंतर अंकित माहीच्या घरी यायला लागला. तो दर शनिवारी माहीच्या घरी राहायचा. याठिकाणी दोघेही पार्टी करायचे आणि सोबत एकत्र दारू प्यायचे. मैत्रीनंतर काही काळानंतर अंकित माहीवर अधिक नियंत्रण मिळवू लागला. तो माहीला छोट्या-छोट्या गोष्टींवरून अडवू लागला. तसेच त्याने माहीला इतर लोकांशी बोलण्यावर आणि बाहेर जाण्यावर बंदी घालू लागला. त्यामुळे माही तिच्या इतर ग्राहकांकडे नाही जाऊ शकत होती आणि यामुळेच मग तिचे उत्पन्नाचे स्रोत बंद होऊ लागले. यावरून अंकितने दारू पिऊन माहीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये अनेकदा भांडणे झाली. इतकेच नव्हे तर अंकितने अनेकदा तिच्या घराची तोडफोडही केली. दुसरीकडे माहीलाही अंकितने दुसऱ्या मुलीशी मैत्री केल्याचा राग येऊ लागला. अंकितच्या वागण्यावरून, तो तिच्या लग्न करणार नाही, असे माहीला कळले. तो फक्त तिचा वापर करत आहे, असे तिला वाटू लागले. त्यामुळे हळूहळू माहीच्या मनात अंकितबद्दल द्वेष वाढू लागला. यादरम्यान, माही या सर्व आपल्या कौटुंबिक समस्यांमुळे पूजा, विधी इत्यादींवर विश्वास ठेवू लागली. यातूनच मग तिची भेट ही सर्पमित्र रमेश नाथ याच्याशी झाली. दरम्यान, माहीने तिच्या घरात 2022 मध्ये कालसर्प दोषाची पूजा एका सर्पमित्राद्वारे केली होती. पूजेसाठी सर्पमित्राने जंगलातून एक नाग आणला होता आणि पूजा विधी पूर्ण करून त्या सापाला त्याने जंगलात सोडले होते. मात्र, यानंतर म्हणजे 6 महिन्यांपूर्वी माहीने सर्पमित्र रमेश नाथ यांच्याकडून दीक्षा घेतली. तेव्हापासून सर्पमित्र तिच्या घरी येऊ लागला. विशेष म्हणजे माहीने या सर्पमित्रासोबत माहीने सर्पमित्राशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच आर्दश नर्सरीजवळ राहणाऱ्या उषा देवी यांना माहीने वर्षभरापूर्वी तिच्या घरी कामावर ठेवलं होतं. त्यामुळे उषा देवी आणि तिचा नवरा रामअवतार याचेही माहीच्या घरी येणे जाणे सुरू झाले. पण अंकितच्या मारहाणीमुळे माही कधी कधी रामअवतारच्या झोपडीत जाऊन राहायची. तसेच ती कधी कधी त्याठिकाणी जेवायलाही जायची. अखेर तिने सर्पमित्राच्या मदतीने अंकित चौहान याची हत्या केली.