Home /News /crime /

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्यांना घडवली अद्दल, लाखोंचा माल हस्तगत

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्यांना घडवली अद्दल, लाखोंचा माल हस्तगत

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यास विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी वसई विरारमध्ये हौदोस घातला होता.

    नालासोपारा, 22 मार्च : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यास विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी वसई विरारमध्ये हौदोस घातला होता. त्या अनुषंगाने विरार पोलिसांनी तपास केला आणि सोनसाखळी चोरट्याला पकडण्यात यश आले असून विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून तब्बल 5 लाख 74 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोराने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याची दखल मीरा, भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते, अपर पोलीस आयुक्त एस जयकुमार, पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ, अभिजित टेलर, संदेश राणे, हर्षद चव्हाण, सचिन लोखंडे, सचिन घेरे, विजय दुबळा, भूषण वाघमारे, संदीप शेरमाळे, इंद्रनील पाटील, रवी वानखेडे, सुनील पाटील, पवन पवार, राहुल कर्पे, जगदीश मराठे, यांनी सापळा रचून अजय किरण शाह याला अटक केली आहे. शाह व त्याच्या साथीदाराने विरार पूर्व गास कोपरी परिसरात मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करून सोनसाखळी चोरून फरार होत असत. या चोरट्यांनी एक नव्हे तर तब्बल 14 जणांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून धूम ठोकत होते. विरार पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळून पहिले तब्बल 15 दिवस सर्व मार्गातील सीसीटीव्ही तपासले असता किरण शाह हा असल्याचा संशय बळावला पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून आणि खबऱ्यांच्या नेटवर्कने माहिती काढून किरण शहा हा विरार मधील बरफ पाडा येथे राहत असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर बराफ पाड्याला चारी बाजूने हेरून शाह याच्या मुसक्या आवळल्या. मात्र त्याचा साथीदार शंकर हाल्या हा मुख्य आरोपी असल्याचे शाह याने पोलिसांना सांगितले. हे ही वाचा-वीज तोडली म्हणून रेल्वे पोलीस भडकले; महावितरणाच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण हे चोरटे ज्या सोनारांना हे सोने विकत होते. त्या सोनारांना सुद्धा पोलिसांनी चौकशी साठी बोलावले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी सांगितले. शंकर हाल्या आणि किरण शाह या जोडगोळीने विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपीने 14 गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपी गुन्ह्यात वापरले गेलेली 50 हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल, 5 लाख 24 हजार 950 रुपये किंमतीचे 153 ग्रॅम वजन असणारे सोन्याचे दागिने, असा एकूण 5 लाख 74 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला आहे. शाह याचा दुसरा साथीदार मुख्य आरोपी शंकर हाल्या हा आधीच्या गुन्ह्यात ठाणे तुरुंगात असून त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Crime news, Virar crime

    पुढील बातम्या