मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नाच्या 10 दिवसांनंतर नववधू झाली बेघर; प्रियकराने रचलं जीवघेणं कारस्थान

लग्नाच्या 10 दिवसांनंतर नववधू झाली बेघर; प्रियकराने रचलं जीवघेणं कारस्थान

प्रेमाच्या नावावर माणूस अनेकदा विकृत वागतो. असाच एक गंभीर प्रकार एका गावात घडला आहे.

प्रेमाच्या नावावर माणूस अनेकदा विकृत वागतो. असाच एक गंभीर प्रकार एका गावात घडला आहे.

प्रेमाच्या नावावर माणूस अनेकदा विकृत वागतो. असाच एक गंभीर प्रकार एका गावात घडला आहे.

 संभल, 20 फेब्रुवारी : प्रेमात अनेकदा माणूस स्वार्थी आणि विकृत वागत असल्याची उदाहरणं अनेकदा समोर येतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. महिलेला यात मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

आपलं प्रेम (love) सफल होऊ शकलं नाही या रागात तरुण आपल्या प्रेयसीला बदनाम करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याचा प्रयत्न पुरता असफल ठरला. त्याला आता तुरुंगाची हवा खात बसावं लागलं आहे. उत्तर प्रदेशाच्या संभल इथं हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

एका प्रियकरानं (lover) आपल्या प्रेयसीचं (girlfriend) लग्न (marriage) झाल्यानंतर तिच्या पतीला एक व्हिडिओ पाठवला. या व्हिडिओमुळं दोघांच्या वैवाहिक जीवनात (married life) मोठीच खळबळ माजली. केवळ दहा दिवसांपूर्वी लग्न झालेली ही महिला आता बेघर (homeless) झाली आहे.

संभल जिल्ह्यात बनिया ठेर इथं ही घटना घडली. एका तरुणानं त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या तरुणासोबत लग्न झाल्यामुळं संतापून एक अश्लील व्हिडिओ (obscene video) तिच्या नवऱ्याला नवरा भयंकर संतापला (angry) आणि त्यानं त्या महिलेला थेट हाकलून दिलं.

या नवविवाहितेने आता माजी प्रियकरावर लैंगिक शोषण (sexual harassment) करून आक्षेपार्ह चित्रण केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून या शरीफ नावाच्या तरुणाला अटक करत तुरुंगात टाकलं आहे.

हेही वाचापत्नीची हत्या करुन पोलिसांना फोन,मग पोलिसांवर गोळीबार करत स्वतःही केली आत्महत्या

अप्पर पोलीस अधीक्षक आलोक जयस्वाल यांनी याबाबत अधिक माहिती सांगितली आहे. ते म्हणाले, की हा आरोपी तरुण नखासा इथं राहतो. या शरीफचं पीडितेच्या घरी येणं-जाणं होतं. यादरम्यान त्यानं पिडीतेसोबत संबंध (physical relations) बनवत त्याचं चित्रण केलं. आता हेच चित्रण त्यानं पीडितेच्या विवाहाला दहा दिवस झालेले असताना रागाच्या भरात तिच्या नवऱ्याला पाठवलं.

First published:

Tags: Uttar pradesh, Video clip