मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

8 वर्षांच्या भावावर लैंगिक शोषण करणाऱ्याला 1 लाख दंड आणि 4 वेळा मुस्काटात; ग्राम पंचायतीचा अजब निर्णय

8 वर्षांच्या भावावर लैंगिक शोषण करणाऱ्याला 1 लाख दंड आणि 4 वेळा मुस्काटात; ग्राम पंचायतीचा अजब निर्णय

बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये अनेकदा शिक्षा मिळणं कठीण होऊन बसतं. इथं मात्र ग्रामस्थांनीच कायदा हातात घेत अजब शिक्षा सुनावली आहे.

बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये अनेकदा शिक्षा मिळणं कठीण होऊन बसतं. इथं मात्र ग्रामस्थांनीच कायदा हातात घेत अजब शिक्षा सुनावली आहे.

बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये अनेकदा शिक्षा मिळणं कठीण होऊन बसतं. इथं मात्र ग्रामस्थांनीच कायदा हातात घेत अजब शिक्षा सुनावली आहे.

  • Published by:  News18 Desk
बिजनोर, 18 फेब्रुवारी : देशभरात सध्या उन्नावमध्ये पुन्हा एकदा झालेल्या कथित बलात्काराची चर्चा आहे. अशावेळी बलात्कारासंबंधीचीच एक वेगळी बातमी चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातीलच बिजनोरच्या (Uttar Pradesh) (Bijnor) एका गावातील इथल्या ग्रामस्थांच्या पंचायतीबाबतची (villagers) (panchayat) ही बातमी आहे. या ग्रामपंचायतीत एका तरुणानं (young boy) त्याच्या चुलत भावावर बलात्कार (raped his 8 year old cousin) केल्याचा आरोप होता. या प्रकरणात पीडित मुलाचं कुटुंब पोलिसात गेलं नाही. मात्र नंतर हे प्रकरण मिटवून घ्यायचं (settled) ठरलं. आणि याबाबत ग्रामपंचायतीनं धक्कादायक पाऊल उचललं. ग्रामपंचायत म्हणाली, की या तरुणाला चार वेळा मुस्काटात मारून (4 slaps) आणि एक लाख रुपये दंड (1 lack rupees fine) वसूल करून हे बलात्काराचं प्रकरण (rape case) मिटवा. या 16 वर्षांच्या तरूणानं आपल्या आठ वर्षीय चुलतभावावर कथितरित्या बलात्कार केला होता. बिजनौरच्या नेहतौर (Nehtaur0 भागात ही घटना घडली. स्थानिक पंचायतीनं हे प्रकरण मिटवायचं ठरवलं. त्यामुळं कुटुंबीयानं पोलिसात तक्रारही दिली नाही. आठ वर्षीय मुलाला रविवारी संध्याकाळी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथं अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यातला आरोपी आणि पिडीत शेजारीच राहतात. हेही वाचापोत्यात कपडे असल्याचं समजून चोरी केली, मात्र ते पोतं उघडताच बसला मोठा धक्का ग्रामस्थांचं याप्रकरणात म्हणणं आहे, की या तरुणानं आठ वर्षीय मुलाला भुलवत शेतात नेलं आणि त्याचं लैंगिक शोषण (sexual harassment) केलं. बाजूच्याच वाटेवरून काही लोक जात होते तेव्हा तात्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला. ते थांबले आणि आवाजाच्या दिशेनं गेले तेव्हा त्यांना प्रकार कळला. ते रडणाऱ्या मुलाला गावात घेऊन आले. त्यानंतर मुलाला बिजनौरच्याजवळ नूरपूर इथल्या खासगी  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी पंचायतसभा बोलावली. या पंचायतीत चार थपडा आणि एक लाख रुपयांचा दंड तरुणाला दिला जाण्याचा निर्णय सुनावण्यात आला.
First published:

Tags: Rape on minor, Uttar pradesh

पुढील बातम्या