Home /News /crime /

मुंबईच्या तरुणाची साताऱ्यामध्ये निर्घृण हत्या, पुरावे मिटवण्यासाठी केलं धक्कादायक कृत्य

मुंबईच्या तरुणाची साताऱ्यामध्ये निर्घृण हत्या, पुरावे मिटवण्यासाठी केलं धक्कादायक कृत्य

सोमवारी रात्री सुमित सुरेश मोरे (32)या तरुणाची काही अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हत्या केली.

  सातारा, 22 जानेवारी : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीची धक्कादायक प्रकरणं समोर आली आहे. साताऱ्यातही एका मुंबईच्या तरुणीची हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबईतील सायनमधील कोलीवाड्यात राहणाऱ्या एका तरुणाची साताऱ्यामध्ये हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे. कोरेगाव आणि खटाव तालुक्याला जोडणाऱ्या बोधेवाडी घाटामध्ये एका मृतदेहासह जळालेल्या अवस्थेत कार पोलिसांच्या हातात आली. मिळालेल्या मागितीनुसार, सोमवारी रात्री सुमित सुरेश मोरे (32)या तरुणाची काही अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हत्या केली. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी तरुणाच्या मृतदेहासोबत कारही पेटवून दिली. इतर बातम्या - शेतकऱ्याची लेक इतकी देखणी की सगळे घालतायत मागणी, मिळवून दिलं 2 लाखांचं बक्षीस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित हा मुंबईच्या सायनमधील कोळीवाडा परिसरात राहतो. तो मुळचा सातारा महिमानगड इथला आहे. सुमितचे संपूर्ण कुटुंब मुंबईत वास्तव्यास आहे. त्याचं प्रोटीन सप्लिमेंटचं दुकान आहे. पण गावी असलेल्या जमिनीची विक्री करण्यासाठी तो कार घेऊन काही दिवस गावी राहण्यासाठी गेला होता. मुंबईला परतताना त्याची हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या व्यवहार पूर्ण करून सुमित रात्रीच्या वेळी मुंबईकडे येण्यासाठी निघाला. तो निघाला त्यावेळी त्याने त्याच्या भावाला फोन करून सांगितलं होतं. अर्ध्या वाटेत आल्यानंतर सुमितच्या लक्षात आलं की त्याचा कोणीतरी पाठलाग करत आहे. यावर त्याने भावाला फोन केला आणि माहिती दिली पण गाढ झोपेत असल्यामुळे त्याने फोन ठेवला. इतर बातम्या - Special Report: साईबाबांनी बीडमध्ये केली होती नोकरी, काय सांगतात पुरावे? दुसऱ्या दिवशी पहाटे बोधेवाडी घाटामध्ये एक कार आणि सुमितचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Renuka Dhaybar
  First published:

  Tags: Satara

  पुढील बातम्या