मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मामीवर जडला जीव; मामाला कळालं अन् घडलं भयानक कांड

मामीवर जडला जीव; मामाला कळालं अन् घडलं भयानक कांड

गुलाबसिंगने भाचा अजयसिंगला पत्नीचा सांभाळ करण्यासाठी ठेवले होते.

गुलाबसिंगने भाचा अजयसिंगला पत्नीचा सांभाळ करण्यासाठी ठेवले होते.

गुलाबसिंगने भाचा अजयसिंगला पत्नीचा सांभाळ करण्यासाठी ठेवले होते.

    जयपूर, 12 ऑगस्ट : राजस्थान राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूरच्या भांकरोटा पोलीस स्टेशन हद्दीतील रिंग रोडवर दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. अजय असे या तरुणाचे नाव आहे. तो हरियाणाचा रहिवासी आहे. या तरुणाच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला असून, धक्कादायक कारण समोर आले आहे. तसेच या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा मामा गुलाब सिंग आणि मामी पुष्पा यांना अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आरोपी हे भांकरोटा येथील महापुरा येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी जयपूर (पश्चिम) च्या पोलीस उपायुक्त वंदिता राणा यांनी सांगितले की, गुलाब सिंग आणि त्याची पत्नी पुष्पा महापुरा भांकरोटा यांना हरियाणातील हिसार येथील अजय कुमार उर्फ ​​कालू यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 9 ऑगस्ट रोजी जयपूरच्या भांकरोटा पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिकाम्या प्लॉटमध्ये पोलिसांना 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तपासादरम्यान, अजय सिंग असे या मृतदेहाची ओळख पटली. अजय मूळचा हिसार (हरियाणा) येथील होता. तसेच सध्या तो आपल्या मामाकडे महापुरा येथे राहत होता. मृतांच्या नातेवाईकांनी गुलाबसिंगवर हत्येचा संशय व्यक्त केल्यानंतर याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता या खुनाचा खुलासा झाला आहे. केला. पोलिसांनी गुलाबसिंहची चौकशी केली असता गुलाब सिंहने सांगितले की, अजयचे त्याच्या पत्नीसोबत अवैध संबंध होते. त्यामुळे याच्या रागातूनच त्याने रात्री अजयचा दोरीने गळा आवळून खून केला. हत्येनंतर पत्नी पुष्पा यांना सोबत घेऊन मृतदेह स्कूटीवरील चादरीत गुंडाळून रिंगरोडजवळील सर्व्हिस लाईनमध्ये फेकून दिला. मृत अनेक दिवसांपासून मामाकडे राहत होता. गुलाबसिंगने भाचा अजयसिंगला पत्नीचा सांभाळ करण्यासाठी ठेवले होते. मात्र याच दरम्यान अजय आणि त्याच्या मामीमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. हेही वाचा - सुनेने आधी सासू..मोठा दीर..जाऊ अन् पुतणीची केली हत्या; राखीपौर्णिमेला घरात पडला मृतदेहांचा सडा ही बाब गुलाबसिंगला कळताच त्याने भाच्याला मारण्याचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांचा भाचा अजय सिंग रात्री झोपला असताना आरोपीने त्याला उठवले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. तसेच मृतदेह स्कूटीवर टाकून महापुरा रिंगरोडजवळील रिकाम्या प्लॉटमध्ये फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी मामा गुलाबसिंह आणि मामी पुष्पा या दोघांना अटक केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jaipur

    पुढील बातम्या