Home /News /crime /

औरंगाबाद हादरलं! दोन महिन्यांच्या गर्भवती महिलेची आत्महत्या; गळफास घेत संपवलं जीवन

औरंगाबाद हादरलं! दोन महिन्यांच्या गर्भवती महिलेची आत्महत्या; गळफास घेत संपवलं जीवन

जयश्री यांचे लग्न वर्षभरापूर्वी झाले होते. ही घटना औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात शनिवारी घडली.

    औरंगाबाद, 29 मे : दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये (Suicide Incident) वाढ होत आहे. वेगवेगळ्या कारणांतून आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. यातच आता औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून एक धक्क्दायक बातमी समोर आली आहे. काय आहे घटना - औरंगाबादमध्ये दोन महिन्यांच्या गर्भवती महिलेने (Pregnant Women) गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात शनिवारी घडली. जयश्री असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर आत्महत्येचे कारण काय आहे, हे अजून समजू शकले नाही. जयश्री यांचे लग्न वर्षभरापूर्वी झाले होते. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जयश्री यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जयश्रीला खाली उतरवत घाटी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. यानंतर घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हेही वाचा - झाड कापण्याच्या मशीनने पत्नी अन् मुलांचा चिरला गळा; लग्नाच्या वाढदिवशी स्वत:लाही संपवलं तर या घटनेनंतर घाटी रुग्णालयात सासर आणि माहेरच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी (Fighting) झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. त्यामुळे परिस्थितीचे गांभार्य पाहता परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. हिंगोलीतही अल्पवयीन मुलीची आत्महत्या -  सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Minor Girl Sucide) केली आहे. ऋतुजा ज्ञानेश्वर साळवे (रा. उटी, बह्मचारी), असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे वय 15 इतके होते. तिने छेडछाडीच्या प्रकाराला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध खाल्ले होते. (Suicide Attempt in Molestation) घरच्यांचा लक्षात हा प्रकार आल्यावर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad News, Crime news, Woman suicide

    पुढील बातम्या