मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कहर! केवळ हुक्की आली म्हणून केला अंदाधुंद गोळीबार! दोन ठार, गावात दहशत

कहर! केवळ हुक्की आली म्हणून केला अंदाधुंद गोळीबार! दोन ठार, गावात दहशत

(File Photo)

(File Photo)

दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी केवळ हुक्की आली म्हणून केलेल्या अंदाधुंद फायरिंगमध्ये (random firing) दोनजण ठार (Two killed) झाले आहेत, तर इतर दोन गंभीर जखमी झाले (two injured) आहेत.

  • Published by:  desk news

पटना, 5 ऑगस्ट : दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी केवळ हुक्की आली म्हणून केलेल्या अंदाधुंद फायरिंगमध्ये (random firing) दोनजण ठार (Two killed) झाले आहेत, तर इतर दोन गंभीर जखमी झाले (two injured) आहेत. बाईकवरून (Motor bike) आलेल्या गुंडांनी गावात स्वैर फायरिंग करायला सुरुवात केली. आपला जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी इतस्ततः धावाधाव सुरु केली. या फायरिंगमध्ये चार जणांना गोळ्या लागल्या. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अशी घडली घटना

बिहारमधील सिवान जिल्ह्यातील रामप्रीत भागात गुरुवारी दुपारी मोटरसायकलवरून आलेल्या गुंडांनी फायरिंग सुरु केलं. वेगानं बाईक चालवत त्यांनी केलेल्या गोळीबाराला विरोध करणं किंवा त्यांना रोखणं नागरिकांना शक्य होत नव्हतं. त्यांना रोखण्यापेक्षा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत होते. या विकृत मनोवृत्तीच्या गुंडांनी स्वैर फायरिंग करत चौघांना गोळ्या घातल्या. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर बाईकवरून आलेले गुंड पळून गेले.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीही फुटेज तपासलं जात आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत गुंडगिरी वाढत चालली आहे. आतापर्यंत वैयक्तिक कारणं किंवा वादातून खून झाल्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र आता काहीही कारण नसताना फिल्मी स्टाईलने गोळीबार करणाऱ्या या गुंडांमुळे नागरिकांमध्ये भय निर्माण झाले आहे. पोलिसांनी अशा गुंडांना अटक करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Gun firing