मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तरुणीसोबत सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप, BSF च्या दोन जवानांना अटक

तरुणीसोबत सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप, BSF च्या दोन जवानांना अटक

या घटनेमुळे बीएसएफ मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे बीएसएफ मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे बीएसएफ मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • West Bengal, India

कोलकाता, 27 ऑगस्ट : देशात बलात्कार, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी बीएसएफच्या दोन जवानांना एका तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या आरोपखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर 24 परगना या जिल्ह्यात घडली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

बीएसएफच्या 68 व्या बटालियनच्या दोन जवानांनी गुरुवारी रात्री बगदा सीमेवरील जितपूर बीओपीजवळील एका शेतात नेऊन एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पीडित तरुणीने बगदा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी दोन्ही जवानांना अटक केली. या घटनेमुळे बीएसएफ मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ मुख्यालयाने उत्तर 24 परगना येथील पोलीस अधीक्षकांकडून आधीच घटनेचा अहवाल मागवला आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे. याप्रकरणी बनगांव ठाण्याचे एसपी तरुण हलदर यांनी सांगितले की, ही घटना बगदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितपूर येथे घडल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. दोन बीएसएफ जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप करत एका तरुणीने तक्रार केली होती.

या तक्रारीच्या आधारे आम्ही बीएसएफच्या दोन जवानांना अटक केली आहे. यापुढे कोणतीही वाढ होऊ नये, यासाठी आम्ही लक्ष ठेवून आहोत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर या दोन जवानांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची विनंती पोलीस करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी पीडित महिलेची चौकशी सुरू केली असून तिची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

हेही वाचा - आरक्षित तिकिट अन् जेवणाचे आमिष दिले, नंतर महिलेला निर्जन स्थळी नेत सामूहिक बलात्कार

आरोपीला योग्य ती शिक्षा व्हावी -

दुसरीकडे, बीएसएफ जवानांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, यापूर्वी काश्मीरमध्ये लष्करावर असे अनेक आरोप झाले होते. त्यातील बहुतेक आरोप खोटे होते. या घटनेत माहित नाही, खरे काय आहे? जर ही घटना खरी असेल तर मोठा गुन्हा आहे. त्यावर योग्य ती शिक्षा द्यावी, असेही ते म्हणाले.

First published:
top videos

    Tags: BSF, Crime news, Gang Rape, West bengal