भोपाळ, 25 सप्टेंबर : महिला पोलीस कॉन्स्टेबलवर तिघांनी बलात्कार करून या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याची संतापजनक (Three men raped women police constable and shot video of the incident) घटना नुकतीच उघडकीला आली आहे. महिला कॉन्स्टेबलला वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून (Called for birthday and reaped) तिच्या ओळखीच्या व्यक्तीने आपल्या भावांसह तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
फेसबुकवरून झाली होती ओळख
मध्यप्रदेशातील निमुच जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या या महिला कॉन्स्टेबलची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअप चॅटवर त्यांचं बोलणं होत असे. एक दिवस आपल्या धाकट्या भावाचा वाढदिवस असल्याचं सांगत आरोपीनं महिलेला एका ठिकाणी बोलावलं. त्या ठिकाणी फॅमिली गेट टुगेदर असून काही सांस्कृतिक कार्यक्रम असल्याची माहिती त्याने दिली. त्यावर विश्वास ठेवत महिला कॉन्स्टेबल घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपी, त्याचा धाकटा भाऊ आणि एका मित्राने या महिलेवर जबरदस्ती केली. या घटनेचा व्हिडिओदेखील त्यांनी शूट केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची धमकी त्यांनी महिलेला दिली.
हे वाचा - काय चाललंय काय? केवळ चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला वीजेचा शॉक
पोलिसांची कारवाई
सप्टेंबरच्या सुरुवातीला घडलेल्या या घटनेची तक्रार महिला कॉन्स्टेबलने 13 सप्टेंबरला दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक केली आहे. घटनेची वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मुख्य आरोपीच्या आईवर ठेवण्यात आला आहे. एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Gang Rape, Madhya pradesh, Rape