जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / माशांऐवजी नदीतून निघाल्या हजारो लिटर दारूच्या बाटल्या; हा प्रकार पाहून अधिकारीही हैराण!

माशांऐवजी नदीतून निघाल्या हजारो लिटर दारूच्या बाटल्या; हा प्रकार पाहून अधिकारीही हैराण!

माशांऐवजी नदीतून निघाल्या हजारो लिटर दारूच्या बाटल्या; हा प्रकार पाहून अधिकारीही हैराण!

नदीत माशांऐवजी दारूच्या बाटल्या निघाल्याने सर्वजण चाट झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटना, 14 मे : बिहारमध्ये (Bihar News) संपूर्ण दारूबंदी (Liquor Ban) लागू आहे. मात्र असं असतानाही येथे अवैध पद्धतीने दारूचा व्यवसाय (Liquor Mafia) सुरू आहे. सारण जिल्ह्यातील छपरामध्ये नदीत माशांऐवजी दारूच्या बाटल्या निघाल्याने सर्वजण चाट झाले. दियारा भागात ड्रोनच्या (Drone) माध्यमातून छापेमारीतून त्रस्त तस्कराने आता गंगा नदीत (Ganga River) दारू लपवत आहेत. उत्पादन विभागाला नदीत लपवलेल्या दारूच्या बाटल्या शोधण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. यानंतही बोटीच्या माध्यमातून छापेमारी सातत्याने सुरू आहे. गंगा नदीत निळ्या पोत्यात तस्करांनी लपवलेली दारू जप्त करण्यात आली आहे. ही दारू ड्रोनच्या माध्यमातून शोधणं कठीण होतं. उत्पादन विभागाच्या टीमने संशयाच्या आधाकावर ही जागा शोधली आणि येथे छापेमारी केली. यात त्यांना जे काही दिसलं ते पाहून अधिकारी हैराण झाले. छपराच्या दियाला भागात सतत छापेमारी सुरू आहे. आता येथील देशी दारू जप्त करण्यात आली आहे. नदीत दारू तयार करण्याचं सामान लपवण्यात आलं होतं. उत्पादन विभागाने बोटीसह सामानही नष्ट केलं आहे. अधिकारी रजनीश कुमार यांनी सांगितलं की, ड्रोनच्या माध्यमातून तपास केल्यानंतर नदीत दारू लपवण्याचं समोर आलं आहे. उत्पादन विभागाच्या टीमने गंगा नदीत शेकडो गोण्या आणि त्यात हजारो लीटर दारू, अन् साहित्य जप्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात