मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीने चौथ्या मजल्यावरुन पतीला दिला धक्का; मात्र तरुण पोलिसांना म्हणाला, पाय घसरला...

पत्नीने चौथ्या मजल्यावरुन पतीला दिला धक्का; मात्र तरुण पोलिसांना म्हणाला, पाय घसरला...

पतीने पोलिसांना खरं कारणं न सांगता पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला.

पतीने पोलिसांना खरं कारणं न सांगता पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला.

पतीने पोलिसांना खरं कारणं न सांगता पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला.

  • Published by:  Meenal Gangurde

इंदूर, 24 जुलै : इंदूरमध्ये एका पत्नीने आपल्याच पतील जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र FIR मध्ये पतीला आपला जबाब नोंदविण्यास सांगण्यात आलं तेव्हा त्याने वेगळचं कारण दिलं आहे. जखमी हिमांशू चौहानला त्याच्या पत्नीने दोन तरुणांना मदतीला घेत चौथ्या मजल्यावरुन धक्का दिला. यानंतर त्याला जखमी अवस्थेत एमवायमध्ये भरती करण्यात आलं आहे. मात्र पोलिसांना सुरुवातीला पाय घसरल्याचं कारण सांगितलं होतं. हिमांशूच्या कुटुंबीयांनाही यामागे त्याची पत्नी कारणाभूत असल्याचा आरोप केला होता. शेवटी पत्नीनेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती हिमांशूने पोलिसांना दिली आहे. जर या प्रकरणात पोलिसांना काही सांगितलं तर गळा दाबून ठार करीन अशी धमकी हिमांशूच्या पत्नीने त्याला दिली होती. त्यामुळे तो सत्य लपवित होता. शेवटी या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंदूरच्या कनाडिया पोलीस ठाणे हद्दीतील भूरी टेकडीवर राहणारा हिंमाशू चौहान नामन तरुण जखमी अवस्थेत एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आला. हिमांशू हा रतलाममध्ये नोकरी करतो. मात्र पत्नीवर संशय असल्या कारणाने तो इंदूरला पोहोचला. तो घरी पोहोचता त्याची पत्नी अन्य दोन तरुणांसोबत खोलीत होती. हिमांशूने विरोध केला तर पत्नी व दोन्ही तरुणांनी त्याला मारहाण सुरू केली. हे ही वाचा-कोविडच्या धास्तीनं तरुण जोडप्यानं संपवलं जीवन; मुंबईमधील मन हेलावून टाकणारी घटना यानंतर चौथ्या मजल्यावरुन त्याला खोली फेकलं. इमारतीतील रहिवाशांनी तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवलं. येथे पोलिसांनी सांगितलं की, हिमांशूने आपला जबाब बदलला आहे. त्याचं म्हणणं आहे की, पाय घसरल्यामुळे तो खाली पडला होता. तर कुटुंबीयांनी पत्नी आणि अन्य दोन तरुणांवर हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप लावला आहे. सध्या पोलिसांनी कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर तपास सुरू केला आहे. हिमांशूच्या कुटुंबीयांचा आरोप कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशूच्या तोंडात बोळा घालून दोन तरुणांनी त्याला मारहाण केली. आणि चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिलं. हिमांशूच्या चेहऱ्यावर, पाय आणि कमरेक फ्रॅक्चर आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

First published:

Tags: Indore, Indore News, Madhya pradesh

पुढील बातम्या