जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Shocking! लोनचे पैसे फेडले नाही म्हणून रिकव्हरी एजेंटने पत्नीचा न्यूड फोटो केला शेअर

Shocking! लोनचे पैसे फेडले नाही म्हणून रिकव्हरी एजेंटने पत्नीचा न्यूड फोटो केला शेअर

Shocking! लोनचे पैसे फेडले नाही म्हणून रिकव्हरी एजेंटने पत्नीचा न्यूड फोटो केला शेअर

मित्राच्या सांगण्यावरुन या कंपनीकडून लोन घेण्यात आला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 3 एप्रिल : जर तुम्ही कोणत्याही बँक वा कंपनीतून लोन (Loan) घेतला आहे आणि वेळेत परत केला नसेल तर अनेकदा रिकव्हरी एजेंटचे फोन येतात. एजेंट्स धमकी देऊन तुम्हाला पैसे परत करण्यास सांगतात. मात्र गुजरातमधील अहमदाबादमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका अॅपच्या माध्यमातून लोन घेणं एका व्यक्तीला भारी पडलं आहे. अॅपच्या माध्यमातून लोन घेणं एका व्यक्तीला भारी पडलं आहे. एका रिकव्हरी एजेंटने त्यांना न केवळ लोन परत करण्याची चेतावनी दिली, तर त्याने त्यांच्या पत्नीचे न्यूड फोटो (Nude Photo) देखील शेअर केले. अहमदाबादमधील बेहरपुरा भागात या प्रकरणात एका 34 वर्षी व्यक्तीने सायबर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, अहमदाबादमधील ही व्यक्ती कोरोनादरम्यान आर्थिक संकटात अडकला होता. त्याने आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार, 28 डिसेंबर 2021 रोजी एका मोबाइल अॅपच्या माध्यमातून लोन घेतला. त्याने 6000 रुपयांचा लोन घेण्याचा निर्णय घेतला. अनेक चार्ज कापल्यानंतर त्याला तब्बल 3480 रुपये मिळाले. एका आठवड्यानंतर त्यांनी पैसे परत केले. पैसे परत केल्यानंतरही दिली धमकी… आर्थिक अडचणीमुळे या व्यक्तीने विविध 14 अॅपच्या माध्यमातून 1.2 लाखांचं लोन घेतलं. यानंतर त्याने जानेवारीत व्याजासह 2.36 लाखांच लोन परत केलं. मात्र पैसे परत केल्यानंतर त्यांना रिकव्हरी एजेंटचे कॉल येत होते. इतकच नाही तर त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जितके लोक होते, त्यांनाही धमकी देऊ लागले. हे ही वाचा- सासरा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, अनेकदा बलात्कारही केला; पतीने मात्र… न्यूड फोटो पाठवून दिली धमकी… तक्रारकर्त्याने सांगितलं की, रिकव्हरी एजेंटने त्यांच्या पत्नीचा फोटो कुठून तरी काढला होता. त्याला मॉफ्ड करून अश्लील करण्यात आला. यानंतर हा न्यूड फोटो पहिल्यांदा लोन घेणाऱ्या व्यक्तीला पाठवण्यात आला. यानंतर कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक नातेवाईकांनाही हा फोटो पाठवण्यात आला. सायबर क्राइम पोलिसांनी आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यूड फोटो पाठवणे, फसवणूक आणि धमकी देण्याची तक्रारही दाखल केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात