अकोला, 10 मार्च : अकोल्यातील अकोट शहरालगत ताजनापूर मार्गावर एका कापूस व्यापाऱ्याला अडवून काही अज्ञात चोरांनी विळा दाखवून व मारण्याची धमकी देऊन त्याच्या जवळील 6,46,920 रुपये बळजबरीने लुटून नेल्याची तक्रार नोंदवली होती. निलेश बापूराव सानप यांनी ही तक्रार केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी यावर कारवाई करीत घटनास्थळी जाऊन तपास केला. तपासादरम्यान मात्र धक्कादायक माहितीची खुलासा झाला. असा कोणताही प्रकार त्या दिवशी घडला नसल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. याचा अर्थ फिर्यादीने केलेली तक्रार बनावटी असल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी फिर्यादीची चौकशी करण्याचं ठरवलं. आणि उलट-सुटल प्रश्न विचारल्यानंतर अखेर फिर्यादीने नेमही घटना सांगितली. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा काही भागीदार मित्रासह गावातील शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल घेऊन तालुक्याच्या ठिकाणी विक्री करीत होता. यानंतर आलेला नफा सर्वजण मिळून वाटून घेत व ज्यांनी शेतमाल घेतला त्यांना खरेदी किंमत देत. गेल्या 5, 6 वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असल्याने आसेगावातील शेतकरी निलेश सानप यांच्यावर विश्वास ठेवून आपला माल त्यांना विक्रीसाठी देत असत. परंतू सानप यांच्या भागीदारी मित्राने नीट हिशोब न केल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फिर्यादीने आसेगावातील काही शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन त्याची अकोट येथे विक्री करून मिळालेले 6,46,920 रक्कम आडगाव येथील नातेवाईकांना बोलावून त्यांच्याकडे दिली व रात्री ही रक्कम आसेगाव येथे घेऊन जाणे धोक्याचे असल्याने उद्या सकाळी रक्कम घेऊन जाईल असे सांगितले. त्यानंतर ते मोटारसायकलने ताजनापूर-वडगाव रस्त्यावरील हमीद मास्टर यांच्या शेताजवळ आल्यानंतर त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बाजूच्या कांद्याचे शेतात फेकून दिला व स्वतःच्या शर्टाचे बटन तोडून आरडाओरडा सुरू केला. हे ही वाचा- चौघे जण गप्पा मारत होते तितक्यात गब्याने केला हल्ला, एकाच्या छाती खुपसला चाकू! हा आरडाओरडा ऐकून जवळील स्थानिकांना काही अज्ञातांनी मोटारसायकल अडवून विळा दाखवून व मारण्याची धमकी देऊन जवळील 6 लाख रुपये बळजबरीने घेऊन गेल्याचे सांगितले व तशी फिर्याद अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. फिर्यादीने स्वतः खोटी फिर्याद दिल्याची कबुली देऊन 6,46,920 रुपये काढून दिले व कांद्याच्या शेतात फेकलेला सॅमसंग कंपनीचा मोबाइल सुद्धा पोलिसांना दाखविला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.