अनैतिक संबंधातून झाली मुलगी, मातेनेच आवळला चिमुकलीचा गळा

अनैतिक संबंधातून झाली मुलगी, मातेनेच आवळला चिमुकलीचा गळा

मातेनेच क्रौर्याची परिसीमा पार करुन नवजात मुलीला मारल्यामुळे या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर आरोपीनाही अटक करा अशी मागणी संतप्त गावकऱ्यानी केली आहे.

  • Share this:

रत्नागिरी 18 जानेवारी : अनैतिक संबंधातून जन्माला घातलेल्या नवजात मुलीला मातेनेच अंत्यंत कृरपणे ठार मारून खाडिकिनारी टाकून दिल्याची घटना रत्नागिरीतल्या वरवडे गावात उघडकीस आलीय . या प्रकरणी संबंधीत महिलेला अटक करण्यात आली असून या कृर गुन्ह्यात या महिलेसोबत आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास आता रत्नागिरी ग्रामीण पोलीस करतायत . या महिलेने 21 डिसेंबर 2019 ला एका मुलीला जन्म दिला होता आणि 22 डिसेंबरला या मुलीला अत्यंत निर्दयपणे ठार करुन तिला खाडीकिनारी असलेल्या खाजण भागात्त फेकून दिले होते.

गावकऱ्याना हे अर्भक आढळल्यानंतर पोलीसांच्या आणि आशा सेविकां तसच पोलीस पाटलांच्या मदतीने  या प्रकरणाचा तपास सुरु होता.

अखेर या महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयाने तिला पोलीस कोठडी दिली आहे . मातेनेच  क्रौर्याची परिसीमा  पार करुन नवजात मुलीला मारल्यामुळे या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर आरोपीनाही अटक करा अशी मागणी संतप्त गावकऱ्यानी केली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 09:59 PM IST

ताज्या बातम्या