मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सहाव्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होते माजी मंत्री; पत्नीनेच घडवली तुरुंगवारी

सहाव्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होते माजी मंत्री; पत्नीनेच घडवली तुरुंगवारी

चौथी पत्नी म्हणते, ते कपड्यांप्रमाणे बायका बदलतात...

चौथी पत्नी म्हणते, ते कपड्यांप्रमाणे बायका बदलतात...

चौथी पत्नी म्हणते, ते कपड्यांप्रमाणे बायका बदलतात...

आग्रा, 20 ऑगस्ट : तीन तलाक (Triple Talaq) आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात फरार झालेले माजी मंत्री चौधरी बशीर यांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. अटकेपासून बचाव करण्यासाठी चौधरी बशीर बरेच प्रयत्न करीत होते. बुधवारी कोर्टाने बशीर यांची अंतरिम जामीन याचिका फेटाळून लावली होती. चौधरी बशीर हे बसपा सरकारमध्ये मंत्री आहेत. (The former minister was preparing to get married for the sixth time; The fourth wife sent jail )

ताजगंज येथील पोलीस ठाण्यात माजी मंत्री चौधरी बशीर यांच्याविरोधात 31 जुलै रोजी तीन तलाकसंदर्भातील गुन्हा दाखल केला होत. यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखालीही त्यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. नगमाने सांगितलं की, 23 जुलै रोजी चौधरी बशीर सहावं लग्न करणार होते. जेव्हा ती याबाबत विचारणा करण्यासाठी घरी गेली तर तिला धक्का मारून घरा बाहेर काढण्यात आलं. याशिवाय तीन तलाक देऊन तिला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

हे ही वाचा-भारतीय सैन्याचं यश, दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

गुन्हेगारी इतिहास असल्यामुळे जामीन मिळाला नाही

तीन तलाक प्रकरणात फरार आरोपी चौधरी बशीर यांनी अंतरिम जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. यात दिल्यानुसार, राजकीय षड्यंत्राअंतर्गत त्याला खोटं सांगून फसवलं जात आहे. त्याच्यावर लावलेले सर्व आरोप निराधार आहेत. न्यायालयाने 11 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी केली. यानंतर 16 ऑगस्ट आणि अंतिम सुनावणी 18 ऑगस्ट रोजी झाली. कोर्टाने प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती पाहत अंतरिम जामीन याचिका फेटाळली.

मंत्र्यांनी केली आहेत 6 लग्न

चौधरी बशीर यांची चौधी पत्नी नगमाने दिलेल्या माहितीनुसार, ते कपड्यांप्रमाणे बायको बदलतात. आता तर ते सहावं लग्न करायच्या तयारी आहेत. 2012 मध्ये नगमाचं चौधरी बशीर याच्यासोबत लग्न झालं होतं. दुसरीकडे नगमाने चौधरी बशीर यांना तुरुंगात पाठवलं आहे. यापूर्वी 2018 मध्ये देखील ते तुरुंगात गेले होते.

First published:
top videos

    Tags: Crime news, Triple talak