मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीपासून दूर जाण्यासाठी नवीन लग्न झालेल्या तरुणाने घेतली 'कोरोना'ची मदत; दुरावा पडला महागात

पत्नीपासून दूर जाण्यासाठी नवीन लग्न झालेल्या तरुणाने घेतली 'कोरोना'ची मदत; दुरावा पडला महागात

या तरुणाविरोधात FIR दाखल करण्यात आला असून हा दुरावा त्याला चांगलाच महागात पडला आहे.

या तरुणाविरोधात FIR दाखल करण्यात आला असून हा दुरावा त्याला चांगलाच महागात पडला आहे.

या तरुणाविरोधात FIR दाखल करण्यात आला असून हा दुरावा त्याला चांगलाच महागात पडला आहे.

    मध्य प्रदेश, 3 जुलै : इंदूरमघ्ये एका व्यावसायिकाच्या मुलाने स्वत:च्याच पत्नीपासून लांब राहण्यासाठी कोरोनाचा बनावटी रिपोर्ट तयार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याने कोरोनाची खोटा रिपोर्ट तयार करून तो पत्नीला पाठवला आणि तो कोविड सेंटरमध्ये (Covid Centre) भरती असल्याचं सांगितलं. मात्र एक महिना झाला तरी पती घरी येत नसल्यामुळे पत्नीला शंका आली. तिने वडिलांकडून रिपोर्ट तपासण्यास सांगितला. जावयाचा रिपोर्ट घेऊन जेव्हा ते त्या लॅबमध्ये गेले तेव्हा हा रिपोर्ट खोटा असल्याचं समोर आलं. आता लॅबने व्यावसायिकाच्या मुलाविरोधात FIR दाखल केली आहे. (The boy made a fake report of Corona to stay away from his own wife) या वर्षी फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिकाचा मुलगा एजाज अहमद याचं लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, शारिरीक अडचणीमुळे त्या दोघांचं वैवाहिक जीवन तणावात होतं. त्यामुळे तो पत्नीपासून लांब राहू इच्छित होता. त्याने 25 मे रोजी एक फोटोशॉप अॅप डाऊनलोड केला आणि इंदूरच्या सेंट्रल लॅबमधील एका पीडित रुग्णांच्या कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये आपलं नाव घातलं. आणि हा रिपोर्ट त्याने कुुटुंबीयांना पाठवला. हे ही वाचा-नागपूर हत्याकांडाच्या रहस्यात 27 मिनिटांची Audio Clip ठरली महत्त्वाची पत्नीला आली शंका एजाजच्या पत्नीला त्याच्यावर शंका आली. घरात तो ठीक होता, त्याशिवाय कोरोनाची काही लक्षणंदेखील नव्हती. मात्र एक महिन्याहून अधिक काळ गेल्यानंतरही तो घरी कसा आला नाही? म्हणून तिने वडिलांना कोरोना रिपार्ट तपासायला सांगितला. वडिलांनी तातडीने सेंट्रल लॅबच्या वेबसाइटवर टोल फ्री क्रमांक काढला आणि लॅबद्वारा एसआरएफ आयडी चेक केला. यावर लॅबने सांगितलं की, हा कोरोना रिपोर्ट खोटा असून दुसऱ्या रुग्णाच्या कोरोना रिपोर्टचं नाव बदलून एजाज नाव लिहिण्यात आलं आहे. यानंतर सेंट्रल लॅबच्या संचालिका विनीता कोठारी यांनी शुक्रवारी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पोलिसांनीही एजाज विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona spread, Coronavirus cases, Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या