जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / स्विगी बॉयला घरात घेणं कुटुंबाला पडलं महागात; घराची केली भयंकर अवस्था

स्विगी बॉयला घरात घेणं कुटुंबाला पडलं महागात; घराची केली भयंकर अवस्था

स्विगी बॉयला घरात घेणं कुटुंबाला पडलं महागात; घराची केली भयंकर अवस्था

ठाणे शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 4 एप्रिल : ऑनलाइन सामान खरेदी करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परिणामी यातून उद्भवणाऱ्या संकटांचाही सामना करावा लागत आहे. ठाणे शहरातील (Thane City News) नौपाडा भागातून अशीच एक लुटीची घटना समोर आली आहे. येथे तीन आरोपींनी स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून तब्बल 13 लाखांची लूट करून फरार झाले. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकारी वसई-विरार आणि भिवंडीतील 67 सीसीटीव्ही तपासले जात होते. शेवटी ठाणे शहर पोलिसांनी या तिन्ही बनावटी स्विगी बॉयना ताब्यात घेतलं आहे. या आरोपींमध्ये जय भगत, अभिषेत सत्यवान आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. हे ही वाचा- घरात लग्नाची तयारी, मुलीच्या कन्यादानापूर्वीच बापाचं डोकं कापलं; भयंकर घटना या आरोपींनी आधी सामान डिलिव्हरी करण्याच्या नावाखाली नौपाडा परिसरातील एका सोसायटीत प्रवेश केला आणि एका फ्लॅटमध्ये चाकूच्या धारावर लूट केली. आरोपींनी 5 लाखांची कॅश, 5 लाखांचे सोन्याचे दागिने आणि अन्य किमतीचं सामानही घेऊन गेले. आणि फरार झाले. यांना अटक करण्यासाठी ठाणे शहर पोलीस अधिकाऱ्यांनी वसई-विरार आणि भिवंडीतील 67 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि यानंतर आरोपींना अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात