चंदिगड, 12 ऑगस्ट : दोन गटात भांडणं सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच (
Police) जमावातील काहींनी तलवारीने हल्ला (
Sword Attack) केला आहे. दोन गटांत जुंपलेलं भांडण (
Quarrel) सोडवत असताना काहीजणांनी पोलिसांवर अगोदर दगड (
Stone pelting) आणि विटा फेकल्या. त्यानंतर धक्काबुक्की करत तलवारीने हल्ला केला. यात 6 पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अशी घडली घटना
पंजाबमधील पंचकुला भागात दोन गटात जोरदार वाद आणि भांडणं सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने काही पोलिसांना घटनास्थळी धाडण्यात आले. भांडणाऱ्या दोन्ही गटांतील नागरिकांना वेगळे करून पोलिसांनी त्यांना समजवायला सुरुवात केली. मात्र त्यातील काहींनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. शांत राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलं. मात्र तरीही नागरिकांनी हल्ले सुरुच ठेवले. काही वेळातच त्या गटातील काहींनी तलवारी उपसल्या आणि पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एका पोलिसाच्या चेहऱ्यावर वार झाले आहेत, तर आणखी एका पोलिसाला वीट लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.
ड्रोनच्या फूटेजनुसार तपास
जमाव आक्रमक होत असल्याचं पाहून पोलिसांनी हवेत दोन राऊंड फायर केले. त्याचा आवाज ऐकून जमावाची पांगापांग झाली. त्या काळात पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दिसलेल्या काही नागरिकांना पकडून त्यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू केली आहे. हल्ले नेमके कुणी केले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अद्याप कुठलीही ठोस नावं पोलिसांना मिळालेली नाहीत.
हे वाचा -
'मार्मिक'च्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार
गाड्यांचीही तोडफोड
या हाणामारीत जमावाने पोलिसांची पीसीआर गाडी फोडून टाकली. त्याचप्रमाणे पोलिसांच्या ऍक्टिव्हा गाडीचीही मोडतोड केली. या जमावातील काहीजणांनी पोलिसांना शिव्या देणे सुरू केल्यामुळेच जमाव भडकला आणि पोलिसांवर हल्ला केला, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.