Home /News /crime /

प्रेमभंगाची धक्कादायक आकडेवारी समोर, दररोज 4 मुलं करतात आत्महत्या

प्रेमभंगाची धक्कादायक आकडेवारी समोर, दररोज 4 मुलं करतात आत्महत्या

प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केल्याच्या घटनांची संख्या हादरवणारी आहे.

    मुंबई, 9 जानेवारी : प्रेमात अपेक्षाभंग होऊन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण 18 पेक्षा कमी वयात प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केल्याच्या घटनांची संख्या हादरवणारी आहे. 2018 मध्ये तब्बल 1 हजार 131 तरुणांनी प्रेमातील अडचणींमुळे आत्महत्या केल्याचं नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. प्रेमभंगामुळे 466 अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केली आहे. तर याच कारणामुळे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या तब्बल 665 इतकी आहे. प्रेमभंगामुळे आत्महत्या केल्याच्या देशभरात 5342 तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. ज्यातील 21 टक्क्यांहून अधिक जण अल्पवयीन आहेत. धक्कादायक! 11 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण, 7 वेळा विक्री आणि... 'अल्पवयीन मुलांमध्ये प्रेमाबद्दल आकर्षण निर्माण करण्यात सगळ्यात मोठा वाटा चित्रपट आणि टीव्ही मालिकांचा आहे. शाळा आणि कॉलेजमधील मुलांची प्रेमकहाणी हा सिनेमांमध्ये वर्षानुवर्ष दाखवला जाणारा विषय आहे. असे चित्रपटच मुलांमध्ये प्रेमाच्या जगात उधळपणे वावरण्याची भावना निर्माण करतात. कोणत्याच शाळेमध्ये आयुष्य जगण्याची पद्धत आणि जबाबदारी याबद्दल शिकवलं जात नाही,' बालहक्क कार्यकर्ते अच्युत राव यांनी म्हटलं आहे. अल्पवयीन मुलांमध्ये प्रेम नव्हे तर केवळ आकर्षण निर्माण होतं आणि त्यात भांडण होताच मुलं आत्महत्येचा पर्याय निवडतात, असं राव यांनी म्हटलं आहे. वयानुसार वाढते परिपक्वता 30 व्या वर्षानंतर प्रेमात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत असल्याचं नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून दिसत आहे. 2018 मध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या 654 लोकांनी प्रेमात आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. 45 वर्ष वयानंतर तर हा आकडा आणखीनच कमी होत जातो. त्यामुळे कमी वयातील मुलांना आयुष्याबद्दल योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Breakup, Couple suicide, Love affair

    पुढील बातम्या