भोपाळ, 2 जुलै: मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यातील एका गावातून गावकऱ्यांनी एक वेगळीच तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे सध्या या गावाची जोरदार चर्चा सुरू आहे. गावकऱ्यांनी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. रात्रीपर्यंत चांगला रस्ता होता, मात्र सकाळी अचानक तब्बल 1 किलोमीरटचा रस्ता गायब झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. उपसरपंच आणि गाकऱ्यांनी गुरुवारी अज्ञात चोरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. (suddenly disappeared Villagers distressed as 1 KM road was stolen) प्रसिद्ध लेखक शरद जोशी यांच्या एका व्यंगात तुम्ही असाच काहीचा किस्सा वाचला असेल. या विषयावर एका चित्रपटाची निर्मितीही करण्यात आली होती. या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचं वृत्त होतं. या चित्रपटात सरकारी कामांमधील हेचं सत्य एका वेगळ्या मात्र टोकदार शैलीत मांडण्यात आलं आहे. सिधी जिल्ह्यातील एका गावातील नागरिकांनीही याच शैलीचा वापर केला. रस्ता कायदोपत्री तयार असतो, त्यासाठी पैसेही घेतले जातात, मात्र तो सत्यात उतरत नाही, असा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा- Online सुनावणीदरम्यान वकील फेस पॅक आणि बनियानवर; न्यायाशीध संतापले कसा तयार झाला रस्ता गावकऱ्यांनी सांगितलं की, ग्राम पंचायतीने त्यांच्या गावात 2017 मध्ये साधा रस्ता तयार केला होता. त्यानंतर 4 ते 5 महिन्यांनंतर 10 लाखांचा खर्च करून क्रांक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र हे सर्व रस्ते कायदोपत्रीच राहिले आहेत. भ्रष्टाचाराचं प्रकरण गावकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त आहेत. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे आहेत. जेव्हा त्यांना कळालं की रस्ता कायदोपत्री तयार झाला आहे आणि यासाठी 10 लाखांचा भ्रष्टाचारा करण्यात आला, तेव्हा उपसरपंचांसोबत गावकरी रस्ता चोरीचा गेल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेले. यावेळ उपसरपंच म्हणाले की, रात्रीपर्यंत गावात रस्ता तयार झाला होता. रस्ता तसा ठिकठाक तयार करण्यात आला होता. मात्र अचानक सकाळी रस्ता गायब झाला.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.