जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुन्हा दलिताच्या वरातीवरुन गोंधळ; मंदिरासमोर डिजे वाजवण्यावरुन पाहुण्यांवर दगडफेक, तिघे जखमी

पुन्हा दलिताच्या वरातीवरुन गोंधळ; मंदिरासमोर डिजे वाजवण्यावरुन पाहुण्यांवर दगडफेक, तिघे जखमी

पुन्हा दलिताच्या वरातीवरुन गोंधळ; मंदिरासमोर डिजे वाजवण्यावरुन पाहुण्यांवर दगडफेक, तिघे जखमी

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्व संध्येला असाच एक भयंकर प्रकार घडला होता. पुन्हा एकदा या वरातीवरुन गावात गोंधळ उडाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 18 मे : Rajgarh News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) राजगड जिल्ह्यात डिजे वाजवण्यावरुन झालेल्या वादात एका दलित तरुणीच्या (Dalit) वरातीवर कथितरित्या एका समुदायाच्या काही लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वरातीतील तिघेजण जखमी झाले आहेत. बुधवारी पोलिसांनी याबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, राजगड जिल्हा मुख्यालयापासून साधारण 38 किलोमीटर अंतरावर जीरापूर भागात मंगळवारी ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सूचना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचले पोलीस… जीरापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सांगितलं की, मंगळवारी जीरापूर येथे एका दलित कुटुंबातील मुलीचं लग्न होतं. रात्री साधारण 11 वाजता सुसनेर ते जीरापूर माताजी भागातील मशिदीसमोरून वरात जात होती. त्यावेळी काही समुदायाच्या तरुणांनी डिजे आणि बँड बंद करण्यास सांगितलं. वरात शांतपणे पुढे सरकली. काही अंतरावर शितला देवीच्या मंदिरासमोरून बँड आणि डिजे पुन्हा सुरू केला आणि सर्वजण पुन्हा नाचू लागले. तेव्हा एका समुदायाच्या काही तरुणांनी वरातीतील पाहुण्यांवर दगडफेक सुरू केला. यात तिघेजण जखमी झाले आहेत. याबाबत सूचना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. एबीपीने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गुन्हा केला दाखल… डिजे वाजल्यामुळे त्यांची झोप उडाल्याचं म्हणत त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. यात तिघेजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात समर लाला, फरहान खान, जुनैद खान, सोहेल खान, साबिर खान, अनस कसाई, डग्गा खान आणि अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात