जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मुंबईत दहशत माजवणारी ‘स्पायडर मॅन’ टोळी अखेर ताब्यात; रात्री चोरीसाठी वापरायचे ही टेक्निक

मुंबईत दहशत माजवणारी ‘स्पायडर मॅन’ टोळी अखेर ताब्यात; रात्री चोरीसाठी वापरायचे ही टेक्निक

अखेर‘स्पायडर मॅन’टोळी पोलिसांच्या ताब्यात

अखेर‘स्पायडर मॅन’टोळी पोलिसांच्या ताब्यात

गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. विशेषतः सोसायट्यांमध्ये घुसून चोरी करण्याचं प्रमाण मोठया प्रमाणात आहे. अशीच एक घटना कांदिवलीत घडलीय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय वंजारा, मुंबई, 6 जुलै: गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. विशेषतः सोसायट्यांमध्ये घुसून चोरी करण्याचं प्रमाण मोठया प्रमाणात आहे. अशीच एक घटना कांदिवलीत घडलीय. घरातील ऐवज लुटल्यानंतर चोरटे फरार झाले होते. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करुन या ‘स्पायडर मॅन’ नावाच्या चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ‘स्पायडर मॅन’ही टोळी अंधेरीपासून कांदिवलीपर्यंत सक्रिय होती. या चोरट्यांनी आतापर्यंत चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत. रात्रीच्या वेळी उड्यात मारत यायचे आणि जायचे. चोरी करण्याची ही टेक्निक वापरुन त्यांनी अनेक चोऱ्या केल्या. चेतन प्रकाश राठोड, दीप प्रकाश पांचाळ आणि अंबिका शंकर राठोड अशी तिन्ही आरोपींची नावे असून, त्यांना अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी अंधेरीचे रहिवासी आहेत. आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

कांदिवली पूर्वेतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयकॉन सोसायटीत 17 जून रोजी रात्री या टोळीने चोरी केली होती. चोरट्यांनी सोन्याची चैन, कानातले, सोन्याच्या अंगठ्या आणि एक हिऱ्याची अंगठी चोरुन नेली होती. या सर्व ऐवजाची किंमत सुमारे 1 लाख 85 हजार रुपये आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात पीडितांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जाहिरात

गुन्हा दाखल झाल्यानंतर समतानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल भगत आणि सहायक पोलीस निरीक्षक संदिपान उबाळे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. सूत्रांची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने समता नगर पोलिसांनी अंधेरी येथून 1 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली. तिन्ही आरोपींकडून 25 ग्रॅम सोन्याची रॉड, सोन्याची चैन आणि हिऱ्याची अंगठी जप्त करण्यात आली आहे. समता नगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी याविषयी माहिती दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात