मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घृणास्पद! दिवाळीच्या रात्री दारूच्या नशेत मुलाने सख्ख्या आईवर केला बलात्कार

घृणास्पद! दिवाळीच्या रात्री दारूच्या नशेत मुलाने सख्ख्या आईवर केला बलात्कार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

एकीकडे दिवाळीच्या रात्री घराघरांमध्ये आनंद साजरा केला जात असताना येथे ही आई यातना सहन करीत होती.

गाजियाबाद, 7 नोव्हेंबर : दररोज बातम्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या (Violence against women) घटना समोर येत असतात. कधी एखाद्या चिमुरडीवर बलात्कार (Rape) केला जातो तर कधी 80 वर्षांच्या वयस्क महिलेला शिकार बनवली जाते.

सातत्याने येणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना या मन सुन्न करणाऱ्या आहेत. गाजियाबादमध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. ही बातमी वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. (son raped his mother threatening to kill her by holding a knife to her neck)

दारू आणि अमली पदार्थांच्या अधिक असलेल्या एका तरुणाने दिवाळीच्या रात्री आपल्या आईच्या गळ्यावर सुरा ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, हा घृणास्पद प्रकार आरोपीच्या आईनेच पोलिसांसमोर कथन केला. जे ऐकून पोलिसांनाही जबर धक्का बसला. शुक्रवारीच पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक केली होती.

हे ही वाचा-घोटभर पाण्यासाठी मालकानं घेतला जीव; बेदम मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

ही घटना गाजियाबादमधील टीला पोलीस ठाणे हद्दातील आहे. गुरुवारी रात्री तरुण दारू पिऊन घरी पोहोचला होता. दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपीने चाकू काढून महिलेच्या मानेवर ठेवला आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितलं की, या घृणास्पद प्रकारानंतर महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन याबद्दल तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनंतर मुलाला अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Diwali 2021, Mother, Rape