चेन्नई, 10 सप्टेंबर : एक आई कधीही आपल्या मुलाचं वाईट करू शकत नाही, असं म्हटलं जातं. परंतु हे विधान एका आईनं चुकीचं सिद्ध केलं आहे. 12 वर्षांच्या मुलाला आईने तिच्या प्रियकरासह निर्दयीपणे मारहाण (Child abuse) केल्याची घटना घडली आहे. या निर्दयी आईने आपल्याच मुलावर तापलेल्या लोखंडी पाईपने हल्ला केला. शेजारच्या एका व्यक्तीने याबाबत बाल तक्रारगृहात माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय आई आणि तिचा 40 वर्षीय प्रियकर मुलाला वारंवार मारहाण करत असत. एके दिवशी मुलाने तिच्या आईला तिच्या प्रियकराशी असलेल्या नातेसंबंधाबद्दल विचारले तेव्हा दोघांनीही मुलावर तापलेल्या लोखंडी पाईपने हल्ला केला. माहिती मिळाल्यानंतर चाइल्डलाइन आणि पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोन्ही आरोपींना अटक केली.
पतीचा मृत्यू
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव शांती देवी असून ती एका कापड दुकानातील कर्मचारी आहे. तिच्या प्रियकराचं एम धुगयाल अहमद असं नाव आहे. शांतीचे पती हरिकृष्णन यांचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगानं निधन झाले, त्यानंतर ती अहमदच्या संपर्कात आली. सुरुवातीला त्यानं तिच्या घरात वाईट आत्मा असल्याची बतावणी करून त्यातून सुटका मिळवून देतो, असे सांगितले. घरातील आर्थिक चणचण संपवण्यासाठीही काही विधी करावे लागतील असे त्यानं सांगितलं. यातून त्यांची ओळख वाढत गेली आणि दोघेही अनैतिक संबंध ठेवू लागले.
मुलानं आईला विचारला जाब
महिलेच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आईच्या वागण्यात अलिकडे बदल जाणवत होता. त्यामुळे न राहून अखेर मुलानं आईला विचारलं की अहमद त्यांच्याकडे वारंवार का येतो? यामुळे संतप्त झालेल्या महिलेनं आणि अहमदनं मुलावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. जेव्हा मुलाने त्यांच्या नात्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी त्याला घरातून निघून जाण्यास भाग पाडले. एवढ्या लहान मुलाला ज्या भयानक अवस्थेतून जावे लागले त्याची कल्पना करणेही कठीण आहे.
शेजाऱ्यांना ठार मारण्याची धमकी
आरोपी महिला आणि तिचा प्रियकर एका रात्री मुलाला घराबाहेर सोडून गेले. त्यानंतर त्याने संपूर्ण रात्र बाहेर पार्क केलेल्या रिक्षात घालवली. शेजारच्या व्यक्तीनं या प्रकरणात आवाज उठवण्याचे धाडस केले नाही, कारण अहमदने त्यांना आणि त्याच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती.
हे वाचा - हाहाहा! नेत्याची अजब आश्वासनं; ज्येष्ठांना बिडीचं पाकिट, नळाला दूध आणि गावात एअरपोर्ट
एका स्थानिक रहिवाशाने याबाबत धाडसानं ग्राम प्रशासकीय अधिकारी (व्हीएओ) आणि चाइल्डलाइनला माहिती दिली. यानंतर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. तिची आई आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mother