जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Shraddha Walkar Case : डेटींग अ‍ॅपवर फसवणूक होऊ नये म्हणून 'ही' घ्या काळजी, पाहा Video

Shraddha Walkar Case : डेटींग अ‍ॅपवर फसवणूक होऊ नये म्हणून 'ही' घ्या काळजी, पाहा Video

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर डेटींग अ‍ॅप वापरणे कितपत सुरक्षित आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 15 डिसेंबर : नाती जोडण्याचं नवं माध्यम म्हणून डेटींग अ‍ॅपची सुरुवात झाली. पण, हेच अ‍ॅप गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नवं साधन बनलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातूनच श्रद्धा वालकर आणि अफताब पूनावावाला यांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांर प्रेमात झालं पण नंतर श्रद्धाला आपला जीव गमावावा लागला. अफताबनं श्रद्धाची हत्या केली. या प्रकरणानंतर संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून या प्रकारचे अ‍ॅप वापरणे कितपत सुरक्षित आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. काय खबरदारी घ्याल? डेटिंग अ‍ॅपबद्दलचे कायदे कडक केले पाहिजेत अशी मागणी, श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी या विषयावर मुंबईत घेतवेल्या पत्रकार परिषदेत केली होती. पण, वास्तविक अशा प्रकारची बंदी घालणं सरकारला शक्य आहे का? या अ‍ॅपवर वावरताना आपण काय काळजी घ्यावी याबाबत  सायबर तज्ज्ञ अंकुश पुराणिक यांची काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत. …तर माझी मुलगी वाचली असती’; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप डेटिंग ॲपसाठी कोणतेही नियम किंवा कायदे नाही आहेत. या प्रकारची प्रकरणं ही सोशल माध्यमांच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर होऊ शकतात. अशा सोशल प्लॅटफॉर्मवर एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलत असताना ती व्यक्ती खरं बोलते का खोटं हे पडताळणी करणं खूप कठीण आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    तरुणांनी शक्यतो कोणत्याही डेटिंग ॲप मध्ये स्वतःला सहभागी करून घेऊ नये. यामध्ये मानसिक त्रास, सायबर क्राईम, पैशांच्या संदर्भात धोका होऊ शकतो. असे वापरताना कोणालाही आपले बँकेचे खाते नंबर अथवा ओटीपी किंवा फोटो पाठवू नये. तसेच या सर्व विषयावरून पालकांनी आपल्या पाल्यांना याबद्दल माहिती देऊन समजावे जेणेकरून अशी एखादी घटना घडल्यास नैराश्यातून त्यांना बाहेर काढता येईल. असे पुराणिक यांनी स्पष्ट केले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात