मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बाबो! 172 कोटी...भाजी विक्रेत्याला ED कडून नोटीस; बँक बॅलेन्स पाहून अधिकारी चक्रावले!

बाबो! 172 कोटी...भाजी विक्रेत्याला ED कडून नोटीस; बँक बॅलेन्स पाहून अधिकारी चक्रावले!

तर स्वत:च्या बँक खात्यातील रक्कम पाहून भाजी विक्रेत्याची हसू की रडू अशी अवस्था झाली आहे.

तर स्वत:च्या बँक खात्यातील रक्कम पाहून भाजी विक्रेत्याची हसू की रडू अशी अवस्था झाली आहे.

तर स्वत:च्या बँक खात्यातील रक्कम पाहून भाजी विक्रेत्याची हसू की रडू अशी अवस्था झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

    नवी दिल्ली, 8 मार्च : एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एक भाजी विक्रेत्याला बँक खात्यातून 172.81 कोटी रुपये आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित रकमेवर इनकम टॅक्स दिला नसल्याने भाजी विक्रेत्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. इनकम टॅक्स विभागाकडून भाजी विक्रेता रस्तोगी यांना नोटीस जारी करण्यात आली असली तरी याबाबत चौकशी सुरू आहे. 26 फेब्रुवारी रोजी रस्तोगीला इनकम टॅक्सकडून नोटीस पाठवण्यात आली आणि त्याच्याकडून पैशांचा सोर्च विचारण्यात आला आहे. सर्वसाधारण भाजी विक्रेत्याच्या बँक अकाऊंटमध्ये 172 कोटी रुपये कसे आला असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर स्वत:च्या बँक खात्यातील रक्कम पाहून भाजी विक्रेत्याची हसू की रडू अशी अवस्था झाली आहे.

    या नोटीसीनंतर विनोद रस्तोगीने स्थानिक पोलिसांशी संपर्क केला. त्याला सायबर सेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. सायबर सेलकडून वेरिफिकेशनच्या क्रमात रस्तोगीकडून काही कागदपत्र मागवण्यात आली आहे. यात 6 महिन्यांपूर्वी रस्तोगीला आयटी विभागाकडून नोटीस मिळाल्याचं समोर आलं.

    तुम्हालाही अनोळखी नंबरवरून मेसेज येतात? सावधान; मुंबईतील महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

    सायबर सेलचे प्रभारी वैभव मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद रस्तोगी त्यांच्या कार्यालयात आले होते. आयकर विभागाला नोटीस दाखवण्यासह त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणात सुरू असलेल्या तपासाात रस्तोगींना काही कागदपत्र सबमिट करण्यास सांगितले आहेत. तर काही गावकऱ्यांनी सांगितलं की, या प्रकारानंतर रस्तोगी घाबरून गेला असून घराला टाळं लावून निघून गेला आहे. एका भाजी विक्रेत्याच्या खात्यात 172 कोटी रक्कम कशी आली असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र या प्रकरणाबाबत काहीच माहिती नसल्याचं रस्तोगीचं म्हणणं असून त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा दावा केला आहे. तरी पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Crime news, Financial fraud, Uttar pardesh