प्रतिनिधी विजय देसाई : बऱ्याचदा मुलं खेळताना इतरांच्या घरांची तोडफोड करतात किंवा चेंडू घरात येतो. त्यामुळे सोसायटीतील लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. खेळताना चेंडू घरात गेल्यानं एका दाम्पत्याने चक्क मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पूर्वेकडील दत्तनगर इथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा चेंडू घरात गेला. त्यामुळे संतापलेल्या इसमाने एका अल्पवयीन मुलाला पळवून पळवून मारहाण केली. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. विरार पोलसांनी याप्रकरणी सदर इसमाला नोटीस दिली आहे. विरारच्या दत्त नगर मधील बिल्डींग च्या आवारात काही मुले खेळत होती त्यावेळी किशोर ढवळे यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून त्यांच्या घरात चेंडू गेल्याने संतप्त झालेल्या किशोरने अल्पवयीन मुलाला पळवून पळवून मारहाण केली आहे. चेंडू घरात गेला म्हणून अल्पवयीन मुलाला ,पळवून पळवून मारहाण,घटना सीसीटीव्हीत कैद, विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. या मारहाणीचा धसका घेतल्याने तो घराबाहेर जाण्यास घाबरत आहे. दरम्यान याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. मारहाण करणारे किशोर ढवळे यांनी आणि विरार पोलिसांनी आम्ही ढवळे यांना नोटीस दिली असून कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र क्यामेरा समोर बोलण्यास नकार दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.