Home /News /crime /

Nashik : शिरोळे मायलेकींच्या कृत्याने नाशिक हादरलं, गीतांजली एक्सप्रेसखाली संपवलं जीवन

Nashik : शिरोळे मायलेकींच्या कृत्याने नाशिक हादरलं, गीतांजली एक्सप्रेसखाली संपवलं जीवन

देवळाली कॅम्पमध्ये शिरोळे कुटुंब राहायला आहे. आत्महत्या केलेल्या अनिता शिरोळे यांचे पती रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार आहेत. कामानिमित्त ते सोलापूरला गेले आहेत. यावेळी मायलेकी दोन्हीच घरात होत्या.

  नाशिक, 30 मे : दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये (Suicide Incident) वाढ होत आहे. कुणी अनैतिक संबंधातून (Immoral Relation), तर कुणाच्या जाचाला कंटाळून तर कुणी नैराश्यातून आत्महत्या (Suicide in Depression) करत आहे. वेगवेगळ्या कारणांतून आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. यातच आता नाशिक (Nashik) जिल्ह्यातून एक धक्क्दायक बातमी समोर आली आहे. काय आहे धक्कादायक बातमी? नाशिक जिल्ह्यात दोघा मायलेकींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे, अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत. देवळाली कॅम्पमध्ये दोघा मायलेकींनी रेल्वे खाली उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडलं. देवळाली कॅम्पमध्ये शिरोळे कुटुंब राहायला आहे. आत्महत्या केलेल्या अनिता शिरोळे यांचे पती रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार आहेत. कामानिमित्त ते सोलापूरला गेले आहेत. यावेळी मायलेकी दोन्हीच घरात होत्या. अचानक दोघांनी मुंबई-नाशिक रोडकडे असलेला रेल्वेमार्ग गाठला आणि गीतांजली एक्सप्रेसखाली आत्महत्या केली. मायलेकीच्या आत्महत्येच्या या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट -  रविवारी दुपारी घडलेल्या या आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. या मायलेकींनी आत्महत्या का केली, मात्र, याचे कारण अजून हाती लागलेले नाही. राखी शिरोळी ही तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तर त्यांची एक मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. हेही वाचा - कोणती मुलगी आपल्या वडिलांसोबत असं करू शकते? वाचून विश्वास बसणार नाही!
  दरम्यान, मायलेकीच्या आत्महत्येच्या या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली असून देवळाली (Devlhali) कॅम्पमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या मायलेकींनी आत्महत्या का केली, याबाबत अजून कोणतेही ठोस कारण पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Nashik suicide, Woman suicide

  पुढील बातम्या