मुंबई, 2 नोव्हेंबर : शीना बोरा हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आता त्यात आणखी एकाची भर पडणार आहे. राहुल मुखर्जीच्या उलटतपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांच्या उलटतपासणीत उत्तर देताना राहुल गडबडल्याचा पाहायला मिळाला. सरकारी रेकॉर्डवर असलेल्या पूराव्यांच्या आधारे सांगळे यांनी धक्कादायक पुरावे उघड केले. राहुल आणि शीना यांच्या रिकव्हर मोबाईल कॉल्स आणि मेसेजेस यावर आधारीत माहिती आणि वास्तविक माहिती यात तफावत उघड झाली. परिणामी या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची चिन्हं आहे. काय झालं कोर्टात? शीना बोरा हत्या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. शीनाची हत्या खरंच झाली का? जर झाली तर नेमकी कधी झाली? यासंदर्भात आज कोर्टात उलटतपासणी करण्यात आली. पोलीस रेकॉर्डवरील FIR आणि सुनावणीत शीनाची हत्या झाल्याचा दिनांक 24 एप्रिल 2012 यामध्ये तफावत आढळली आहे. तर राहुल आणि शीनाच्या मेसेज संभाषणात शीनाला मिळालेले मेसेज. 2012 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात राहुल आणि शीना यांच्यात अनेकवेळा मेसेजद्वारे संभाषण झालं. मार्च 2013 मध्येही दोघांत संवाद असल्याचा तांत्रिक पुरावा मिळाला आहे. राहुल मुखर्जीची उलटतपासणी उद्याही कायम राहणार आहे. 2012 पासून शीना बोरा हत्याकांडात काय घडले? 24 एप्रिल 2012: शीना बोराच्या कंपनीने त्यांचा राजीनामा स्वीकारला. मात्र, हा तिच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ मिखाईल याने पाठवल्याचा दावा सीबीआयने केला. 23 मे 2012: महाराष्ट्रातील रायगडमध्ये पोलिसांना एक विकृत मृतदेह सापडला. नंतर सीबीआयने हा शीनाचा मृतदेह असल्याचा दावा केला. 21 ऑगस्ट 2015: इंद्राणी मुखर्जीचा जुना ड्रायव्हर श्यामवर राय याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याने पोलिसांना तीन वर्षांपूर्वी शीनाची हत्या आणि गुन्ह्यात इंद्राणीचा कथित सहभाग याबद्दल सांगितले. 25 ऑगस्ट 2015: इंद्राणी मुखर्जीला मुंबई पोलिसांनी अटक केली. 26 ऑगस्ट 2015: इंद्राणी मुखर्जीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना याला कोलकाता येथे अटक करण्यात आली. 1 सप्टेंबर, 2015: इंद्राणी मुखर्जीचा पूर्वाश्रमीचा पार्टनर सिद्धार्थ दास, कोलकाता रहिवासी, शीना बोराचा जैविक पिता असल्याचा दावा करतो. 18 सप्टेंबर 2015: केस सीबीआयकडे हस्तांतरित. एजन्सीने इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. वाचा - 10 वर्षाच्या मुलाने केली आई आणि तिच्या प्रियकराची पोलखोल, पित्याच्या हत्ये… 19 नोव्हेंबर 2015: इंद्राणीचा तत्कालीन पती पीटर मुखर्जीला सीबीआयने अटक केली. जानेवारी 2016: सीबीआयने इंद्राणी आणि श्यामवर राय यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. नंतर पीटर मुखर्जी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. जानेवारी-फेब्रुवारी 2017: खटल्याची सुनावणी सुरू. विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणी, पीटर आणि संजीव खन्ना यांच्यावर शीना बोराची हत्या, कट रचणे, अपहरण करणे, पुरावे नष्ट करणे आणि खोटी माहिती देणे या गुन्ह्याखाली आरोप ठेवले आहेत. 4 ऑक्टोबर, 2019: इंद्राणी आणि पीटर कैदेत असताना त्यांचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतात. त्यांचा घटस्फोट मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. 6 फेब्रुवारी 2020: मुंबई हायकोर्टाने पीटर मुखर्जीला जामीन मंजूर केला. कारण या प्रकरणात त्यांचा सहभाग सिद्ध करण्यासाठी कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नाही. 6 फेब्रुवारी 2020: श्यामवर रायने इंद्राणीचं नाव मुख्य आरोपी असल्याच्या कारणावरुन मुंबई हायकोर्टाने इंद्राणीची जामीन याचिका फेटाळली. तिचे आजारांचे दावे देखील अतिशयोक्तीपूर्ण होते. 20 मार्च 2020: सीबीआयने जामीन आदेशाला आव्हान न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पीटर मुखर्जीची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. 18 मे 2022: इंद्राणी मुखर्जीला अटक झाल्यानंतर जवळपास सात वर्षांनी SC ने जामीन मंजूर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.