नोएडा (दिल्ली), 18 मे : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) जोरात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या रोजगारावर पाणी फेरलं गेलं आहे. नोकऱ्या गेल्यानं काही मुलींनी वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
टाळेबंदी दरम्यान पोलिसांनी नोएडा सेक्टर 122 परिसरामध्ये एका दुकानावर छापा मारला. येथे अवैधरीत्या वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
येथील सी ब्लॉक परिसरातील एका दुकानात अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर सोमवारी रात्री येथे पोलिसांनी छापा मारला, असे अपर पोलीस उपायुक्त अंकुर अग्रवाल (द्वितीय झोन) यांनी सांगितले.
अग्रवाल यांनी सांगितले की पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून हा व्यवसाय चालवणारी कथित संचालिका महिला आणि दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत काही लोकांनादेखील ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनास्थळावरून काही आक्षेपार्ह वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या असून ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त अब्दुल कादिर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या या मुलींनी आणि संबंधित संचालिका महिलेनं टाळेबंदीमुळे नोकरी गेल्यानं आम्ही हे काम करत असल्याचे पोलिसांसमोर सांगितलं. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या महिला विविध लोकांशी संपर्क करून वेश्या व्यवसाय चालवायच्या आणि आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करायच्या.
हे वाचा - अमृता फडणवीसांच्या शायरीनं ट्विटरवर राजकीय वादळ; रुपाली चाकणकरांनी केला पलटवार
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या रोजगार व्यवसायांवर विपरित परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी लोकांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. मात्र, नोकऱ्या गेल्यानंतर वेश्याव्यवसाय सुरू केल्याचं जरी या महिला सांगत असल्या तरी त्यातील तथ्य अद्याप बाहेर यायचे आहे. या महिला अगोदर खरोखरच नोकरीला कोठे होत्या का? त्या कोणत्या स्वरुपाच्या नोकऱ्या करत होत्या याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नसून पोलीस याबाबत तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi News, Sex racket