इंदूर, 13 जून : महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे एकीकडे चित्र असताना दुसरीकडं बलात्काराबाबतची खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दोन मुलींनी अचानक पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दिली. मात्र, पोलीस तपासात या मुली सेक्स रॅकेटशी (Sex Racket Indore) संबंधित असल्याचं समोर आलं आहे. पैशांवरून त्यांचा ग्राहकांशी वाद झाल्यावर त्यांना धमकावण्याच्या हेतूने त्यांनी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मुलींकडून सखोल माहिती घेतली, त्यांची विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी या दोन मुलींसह 8 तरुणांना अटक केली. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली हैदराबादच्या आहेत. दलालांच्या साहाय्याने त्या हैदराबादहून (Hyderabad girls Sex Racket) इंदूरला पोहोचल्या होत्या. एका ब्रोकरमार्फत या मुली बर्याचदा इंदूरला येत असत. दलाल बहुधा बाहेरील राज्यातील मुलींना इंदूरला बोलावत असल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार मध्यप्रदेशमधील इंदूरच्या लासुडिया पोलीस ठाणे परिसरातील आहे. प्रत्यक्षात ज्या हॉटेलमध्ये या मुली राहिल्या होत्या, तेथे सेक्स रॅकेटमध्ये त्यांचे पैशावरून ग्राहकांशी वाद झाला होता. त्यामुळं त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन ग्राहकांविरूद्ध सामूहिक बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला ही बाब संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही हॉटेलवर छापा टाकला, असे पोलीस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी सांगितलं हे वाचा - ‘रुग्णालयात माझ्या आईसोबत छेडछाड झाली आणि…’; रडतरडत चिमुकलीची स्मृती इराणींकडे तक्रार या मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून बरीच माहिती घेण्यात आली. त्यानंतर त्यांचा मोबाइलही तपासण्यात आला. तपासादरम्यान मुलींच्या मोबाइलमध्ये अनेक प्रकारच्या आक्षेपार्ह बाबी आणि चॅट सापडल्या. यानंतर पोलिसांनी मुलींनी दिलेल्या माहितीवरून हॉटेलवर छापा टाकला आणि सर्वांनाच अटक केली. हॉटेल चालकालाही ताब्यात घेण्यात आले असून संशयित म्हणून त्याची चौकशी केली जात आहे. या प्रकारच्या घटनांमुळं पोलिसांना तक्रार दाखल करताना काळजी घ्यावी लागते. अनेकदा खरंच बलात्कार झालेल्या प्रकरणातही पोलिसांना मग उलट-सुलट प्रश्न करून घटनेची सत्यता पडताळावी लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.