मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नकली दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश, डिटर्जंड पावडरपासून बनलेलं 10 हजार लिटर सिंथेटिक दूध जप्त

नकली दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश, डिटर्जंड पावडरपासून बनलेलं 10 हजार लिटर सिंथेटिक दूध जप्त

सर्वांच्या घरात दूध असतंच. एक लिटर दुधात 40 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे दूध रोज प्यायला हवं.

सर्वांच्या घरात दूध असतंच. एक लिटर दुधात 40 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे दूध रोज प्यायला हवं.

डिटर्जंट पावडर (Detergent Powder) आणि घातक केमिकलचा (Chemicals) वापर करून तयार करण्यात येणाऱ्या नकली दुधाच्या (Bogus milk) रॅकेटचा पोलिसांनी पदार्फाश केला आहे.

मथुरा, 8 ऑगस्ट : डिटर्जंट पावडर (Detergent Powder) आणि घातक केमिकलचा  (Chemicals) वापर करून तयार करण्यात येणाऱ्या नकली दुधाच्या (Bogus milk) रॅकेटचा पोलिसांनी पदार्फाश केला आहे. या प्रकऱणी पोलिसांनी 7 जणांना अटक (7 arrested) केली असून 10 हजार लिटर विषारी, सिंथेटिक दुधाचा टँकरही जप्त केला आहे.

अशी झाली कारवाई

उत्तर प्रदेशातील मथुरेत एक टोळी डिटर्जंट पावडर, बटाटे, रिफाइन्ड तेल आणि केमिकल यांचा वापर करून नकली दूध तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मथुरेजवळच्या जुगसना गावात संध्याकाळच्या वेळी छापा टाकला. यावेळी या विषारी दुधाचा व्यवसाय करणाऱ्या 7 जणांना पोलिसांनी अटक केली.

नकली दूध बनवणारी ही टोळी स्किम्ड मिल्क पावडरमध्ये पाणी मिसळून एक द्रावण तयार करत असे. त्यानंतर ते मिश्रण गरम करून त्यात रिफाइन्ड ऑईल आणि डिजर्जंट पावडर टाकत असे. हे नकली दूध खराब होऊ नये, यासाठी त्यात कास्टिंग सोडा आणि इतर केमिकल्सचा वापर केला जात असे.

उत्तर प्रदेशात मोठं नेटवर्क

उत्तर प्रदेशातील अनेक शहरांशी या नकली दुधाच्या व्यवसायाचे धागेदोरे जोडलेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या फॅक्टरीतून तयार होणारं दूध हे वेगवेगळ्या शहरांमध्ये विक्रीसाठी जात असे. तब्येतीसाठी अत्यंत घातक असणारं दूध लहान मुलांच्या शरीरावर तर अत्यंत विपरित परिणाम करत होतं. अशा प्रकारे नकली दुधाचा व्यवसाय जोरदार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे केवळ दूधच नव्हे, तर इतर दुग्धजन्य पदार्थही बनावट पद्धतीनं तयार केले जात असल्याचं आढळून आलं आहे. या फॅक्टरीत लोणी, पनीर आणि क्रीमदेखील तयार केलं जात होतं. या प्रकऱणी मुख्य आरोपी मुन्नालाल आणि इतरांची पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Dangerous milk combinations, Uttar pardesh