नालासोपारा, 01 मार्च: शनिवारी विरार (Virar) परिसरात समय चौहान नावाच्या एका तरुणाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या (Shot dead) करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी समयवर चार गोळ्या झाडल्या (Fired 4 bullet) होत्या. या हल्ल्यात समय रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यूमुखी (Death) पडला होता. ही घटना ताजी असताना सोमवारी सायंकाळी विरार परिसरात गोळीबाराची (Gun firing at virar) आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मागील तीन दिवसात गोळीबाराची ही दुसरी घटना समोर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आसाराम राठोड असं हल्ला झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते कंत्राटदार (Contractor)आहेत. कंत्राटदार राठोड यांच्यावर विरार पूर्वेकडील बरफपाडा परिसरात हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी राठोड यांच्यावर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात राठोड गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. गोळीबाराची घटना घडताच आसपासच्या नागरिकांनी राठोड यांना तातडीने संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. हेही वाचा- गुप्तधनासाठी उपसरपंचानं खेळला खुनी खेळ; गावातील शेतकऱ्याला दिला भयंकर मृत्यू याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. राठोड यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी कोण होते? आणि त्यांनी कोणत्या कारणातून हा हल्ला केला याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास विरार पोलीस करत आहेत. हेही वाचा- Thane: न्यायालयीन कोठडीत आरोपीचा तडफडून मृत्यू, धक्कादायक कारण समोर धक्कादायक बाब म्हणजे, 22 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी तीनच्या सुमारास 50 वर्षीय कंत्राटदार आसाराम राठोड यांच्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबारातून राठोड बचावले होते. एकदा जीवदान मिळाल्यानंतर पाच महिन्यानंतर आरोपींनी पुन्हा एकदा राठोड यांच्यावर गोळीबार केला आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमन्यास्यातून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. विरारमध्ये तीन दिवसांत गोळीबाराची दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.