मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /VIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी

VIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी

निवडणूकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिल्यानं एका दलित युवकाला पंचायत प्रमुखानं गंभीर मारहाण केली आहे. त्याचबरोबर पीडित युवकाला घरी बोलावून थुंकी चाटायला लावली आहे.

निवडणूकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिल्यानं एका दलित युवकाला पंचायत प्रमुखानं गंभीर मारहाण केली आहे. त्याचबरोबर पीडित युवकाला घरी बोलावून थुंकी चाटायला लावली आहे.

निवडणूकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिल्यानं एका दलित युवकाला पंचायत प्रमुखानं गंभीर मारहाण केली आहे. त्याचबरोबर पीडित युवकाला घरी बोलावून थुंकी चाटायला लावली आहे.

गया, 13 एप्रिल : आगामी पंचायत निवडणूकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिल्याने एका दलित युवकाला अमानुष वागणूक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी पंचायत प्रमुखाने आणि त्याच्या काही कार्यकर्त्यांनी पीडित दलित युवकाला गंभीर मारहाण केली आहे. त्याचबरोबर पीडित युवकाला घरी बोलावून थुंकी चाटायला लावली (panchayat head forced dalit young man to lick spit)आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून अनेकजण फरार झाले आहेत.

संबंधित घटना बिहारच्या गया येथील आहे. संबंधित दलित युवकानं घुरियावां पंचायतच्या माजी प्रमुख अभय कुमार सिंह यांना निवडणुकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या अभय कुमार सिंह आणि त्यांच्या काही समर्थकांनी संबंधित दलित युवकाला अमानुष वागणूक दिली आहे. त्यांनी सर्वप्रथम युवकाला बेदम मारहाण केली. तसंच घरी बोलावून स्वतःची आणि उपस्थित असणाऱ्या अन्य लोकांची थुंकी चाटायला लावली आहे. या व्हिडीओत दिसणारे बहुतांशी लोकं युवकाला थुंकी चाटायला भाग पाडत आहेत.

" isDesktop="true" id="539845" >

या घटनेनंतर पीडित युवकानं दुसरा एक व्हिडीओ तयार करून कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर पंचायतच्या माजी प्रमुखानं आपल्याला थुंकी चाटायला लावली असल्याचंही त्याने व्हिडीओत म्हटलं आहे. शिवाय आरोपींनी रात्री घरी येऊन आपल्या घरच्यांना मारहाणही केली आहे, असा दावाही त्यानं केला आहे. आरोपींच्या भीतीमुळे पीडित युवकाच्या कुटुंबीयांनी गाव सोडलं असून नातेवाईकांच्या घरी आसरा घेतला आहे.

(वाचा- लज्जास्पद! बैठकीत सगळ्यांना बसायला खुर्च्या, दलित महिलेला मात्र जमिनीवर बसवलं)

या घटनेचा व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर एसएसपी आदित्य कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. व्हिडीओच्या आधारे कारवाई करत वजीरगंज पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या घटनेतील अनेक आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Bihar Election, Shocking video viral